Online Teacher Transfer : नमस्कार मित्रांनो, आजच शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत ऑनलाइन बदली संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे.शिक्षणाधिकारी स्तरावरील रिक्त पदांचे माहिती भरायची मुदत आज संपली आहे.
आता संवर्ग १ आणि २ अंतर्गत होकार किंवा नकार कळवण्या संदर्भात ची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. आता हा होकार आणि नकार कसा द्यायचा आपला अर्ज कसा सबमिट करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
विशेष संवर्ग भाग-१
शिक्षकांनी जर विशेष संवर्ग भाग-१ हा पर्याय निवडला, तर त्यांना विशेष संवर्ग भाग-१ हा अर्ज दिसेल.
शिक्षक जर बदलीपात्र असेल आणि तो विशेष संवर्ग भाग-१ मध्येही येत असेल आणि त्याला बदलितून सूट हवी असेल तर तो ‘मला बदलितून सूट हवी आहे?’ या प्रश्नाचे उत्तर ‘Yes’ निवडेल.
त्याचे नाव बदलीपात्र शिक्षकांच्या यादीत आहे आणि त्याला बदली विशेष संवर्ग भाग-१ मधून बदली हवी असेल तर ‘मला बदलितून सूट हवी आहे?’ या प्रश्नाचे उत्तर तो ‘No’ निवडेल.
• त्यानंतर विशेष संवर्ग भाग-१ चे प्रकार त्याला ड्रॉपडाऊन मधून निवडायचा आहे.
• जर त्याने ‘स्वतःचे’ निवडले तर त्याला खालील ड्रॉपडाऊन मधील चौदा पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे.
• जर त्याने ‘जोडीदाराचे’ निवडले तर त्याला खालील ड्रॉपडाऊन मधील सहा पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे व अर्ज सबमिट करायचं आहे.
• मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाचा विशेष संवर्ग 1 अथवा 2 चा अर्ज रद्द केला असेल तर त्या शिक्षकाला पुनः अर्ज करता येणार नाही व बदली प्रक्रियेतून त्याचा अर्ज बाद होईल.
• विशिष्ठ मुदतीमध्ये शिक्षकांना आपला अर्ज कितीही वेळा मागे घेता येईल व पुनः भरता येईल.
विशेष संवर्ग भाग – २
शिक्षकांनी जर विशेष संवर्ग भाग-२ हा पर्याय निवडला तर त्यांना विशेष संवर्ग भाग-२ चा अर्ज दिसेल.
• शिक्षकांनी ३० किमी चा चेक बॉक्स चेक केला की त्यांना पुढील अर्ज दिसेल.
• त्यांच्या व त्यांच्या जोडीदाराच्या शाळेमधले अंतर त्यांना येथे नमूद करावे लागेल.
• जर शिक्षकांनी प्रथम प्रकार म्हणजे दोन्ही जोडीदार जिल्हा परिषदेत कार्यरत आहे हा पर्याय निवडला तर शिक्षकाला त्याच्या जोडीदारचा शालार्थ आयडी प्रविष्ट करायचा आहे.
• अर्ज भरताना शिक्षकांना त्यांच्या व त्यांच्या जोडीदाराच्या मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
• जर शिक्षकांनी दुसरा ऑप्शन निवडले तर त्यांना जोडीदारचा शालार्थ आयडी द्यायची आवश्यकता नाही. ते अर्ज सबमिट करू शकतात.
• मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाचा विशेष संवर्ग 1 अथवा 2 चा अर्ज रद्द केला असेल तर त्या शिक्षकाला पुनः अर्ज करता येणार नाही व बदली प्रक्रियेतून त्याचा अर्ज बाद होईल.
• विशिष्ठ मुदतीमध्ये शिक्षकांना आपला अर्ज कितीही वेळा मागे घेता येईल व पुनः भरता येईल.
बदली पोर्टल लिंक
👇👇