Close Visit Mhshetkari

LUMIERE AI : गुगल कडून सर्वासाठी मोठी आनंदाची बातमी …

LUMIERE AI : कल्पना करा तुमच्या मनातील एखाद्या कवितेला, गाण्याला किंवा एखाद्या विचाराला डोळ्यासमोर उभी करण्याची क्षमता एखाद्या वस्तूमध्ये असेल तर ते जादू पेक्षा कमी नाही.

गुगलकडून अशी भेट देण्यात येणार असून याद्वारे शब्दांना जिवंत करुन दाखवू शकते, त्यांना रंग आणि हालचाल देऊ शकते.गूगलच्या ‘लुमियर’ नावाच्या नवीन तंत्रज्ञानानं हेच करुन दाखवले आहे!

LUMIERE AI Google Update

मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ बनवण्याची आवड असेल तर Google च्या LUMIERE AI मॉडेलच्या मदतीने आपले काम सोपे होणार आहे हा टूल आपल्याला काही मिनिटात व्हिडिओ बनवून देऊ शकणार आहे.यासाठी तुम्हाला फक्त LUMIERE ला काही सूचना द्याव्या लागतील आणि त्यानंतर चुटकीसरशी तुमचा व्हिडीओ तयार होईल.

What is LUMIERE AI ?

लुमियार हे कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आधारित साधनाही जे आपण दिलेल्या मजकुरावर आधारित व्हिडिओ क्लिप तयार करू शकते उदाहरणार्थ आपण एखादी कविता एखादं गाणं किंवा एखादा छोटासा परिच्छेद लिहून लुमिनियर ला कमांड दिल्यानंतर लुमियर त्यावर आधारित तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ तयार करुन देईल. सदरील व्हिडिओ व्हिडिओ फक्त काही सेकंदांचा असतो, पण तो इतका वास्तववादी आणि चांगला असतो की तो तुम्हाला आश्चर्यचकित करुन टाकेल.

लुमियर कसे काम करते?

लुंगी और लाखो व्हिडिओ आणि त्यांच्यासोबत असलेल्या सब टायटल वर आधारित सामग्रीद्वारे प्रशिक्षित करण्यात आले आहे यामुळे मजकूर आणि दृश्य मधील संबंध समजावून घेतला जाऊ शकतो.

जेव्हा तुम्ही त्याला एखादा मजकूर द्याल, करण्यासाठी या ज्ञानाचा वापर करतो. तुमच्या मजकुरातील संकल्पना,भावना आणि क्रियांचा अर्थ समजून तुमच्यासाठी मजकुरावर आधारित एक व्हिडिओ तयार घेतो.

लुमियरचे (LUMIERE AI) काय उपयोग ?

Education : लुमियरचा वापर विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना समजावण्यासाठी केला जाऊ शकतो. शिक्षक एखादा विषय समजावण्यासाठी एखादा मजकूर लिहून देऊ शकतो.

Entertainment : – लुमियरचा वापर तुमच्या स्वतःच्या कथा, कविता आणि गाण्यांवर आधारित व्हिडिओ तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

Arts :- लुमियरचा वापर कलाकारांना त्यांच्या कलाकृतींना जिवंत करण्यासाठी केला जाऊ शकतो. एक चित्रकार त्याच्या चित्रावर आधारित एक व्हिडिओ तयार करू शकतो.

लुमियरचे भविष्य काय?

सध्या लुमियर विकासाच्या अवस्थेत आहे, परंतू त्याचे भविष्य खूपच उज्ज्वल दिसत आहे. सदरील तंत्रज्ञानामुळे आपण कथा सांगण्याच्या आणि कला तयार करण्याच्या नवीन मार्गांचा शोध लावू शकतो. लुमियरच्या मदतीने भविष्यात चित्रपट, टीव्ही शो आणि अगदी व्हिडिओ गेम्स देखील तयार करण्यास मदत मिळणार आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment