Group Insurance : राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना,१९८२ नुसार लागू करण्यात आलेली आहे.सदरील विमा योजनेद्वारे शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याला विमा संरक्षण मिळत असते. कर्मचाऱ्याला आपली सेवा संपल्यानंतर सदरील रकमेवरती व्याज आणि मुद्दल परत मिळत असते.
सरकार वेळोवेळी घटनेतील रकमेवर व्याजदर निश्चित करत असते. कर्मचाऱ्याला द्यावयाची रक्कमची सुद्धा माहिती त्या शासन निर्णयाद्वारे जाहीर करत असते. अशाच प्रकारचा शासन निर्णय आज निर्मित करण्यात आलेला आहे.
Group Insurance Calculator
आता दिनांक १ जानेवारी,२०२३ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२३ या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आला होता.
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १९८२ अंतर्गत सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांचे सभासदत्व दिनांक १ जानेवारी २०२४ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत संपुष्टात आले आहे .सदरील कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता सोबत जाहीर करण्यात आला आहे. सदर तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिटकरिता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.
मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांनी दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून राजीनामा, सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना/कर्मचा-यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.
अपघात विमा योजना कॅल्क्युलेटर
शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ अन्वये बचत निधीमधील शिल्लक रकमांवर दरसाल विहित दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज देण्याबाबत तरतूद आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या बचत निधीमधील संचित रकमांवर दि.०१ जानेवारी, २०२४ पासून दर साल दर शेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा ४ % दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे.
गट विमा योजना अंतर्गत मिळणारी रक्कम व व्याज येथे पहा