Mahagai Bhatta wadh : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो महागाई भत्ता वाढणार अशी कालच आपण एक बातमी दिली होती. ही बातमी खरी ठरलेली असून, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता बरोबरच ग्रॅज्युटी मध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर
महागाई भत्ता झाला 50 %
केंद्र सरकारच्या कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव 4% महागाई भत्ता देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परिणामी आता महागाई भत्ता 50 टक्क्यांवर गेला आहे.
ग्रॅच्युईटीची मर्यादा 20 लाखांवरून 25 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक पार पडली. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 46 % महागाई भत्ता दिला जातो.यात 4% टक्के वाढ करण्यात आली असून ही वाढ एक जानेवारी 2024 पासून लागू असणार आहे.
#WATCH | Union Cabinet approves hike in Dearness Allowance to govt employees and Dearness Relief to pensioners by 4% from January 1, 2024, announces Union Minister Piyush Goyal. pic.twitter.com/IsWUnwBGHW
— ANI (@ANI) March 7, 2024
ग्रॅच्युईटीची मर्यादा 25 लाख
आता केंद्र सरकारच्या तिजोरीवर 12868 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. या निर्णयाचा फायदा केंद्र सरकारच्या 49 लाख 18 हजार कर्मचारी व 68 लाख 95 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. ग्रॅच्युईटीची मर्यादा आतापर्यंत 20 लाखांपर्यंत होती. ती आता 25 लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.