Close Visit Mhshetkari

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांनी 5 वर्षात व्हाल लखपती ! कसे ते समजून घेऊया…

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. आतापर्यंत राज्यातील 80 लाख महिलांच्या खात्यात याची रक्कम आली आहे. या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात.

नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जवळपास 32 लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत रक्षाबंधनापूर्वी सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार असा शब्द सरकारकडून देण्यात आला होता.

Ladki Bahin Yojana investment in SIP

माझी लाडकी योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी मिळणार असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केलेले आहे तर मित्रांनो या लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयांच्या मदतीने आपण लाखो रुपये कसे जमा करू शकता याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

हे पण वाचा ~  Sip investment : फक्त करा १०० रुपयांची गुंतवणूक, मिळवा ४ कोटींचा फंड; आयुष्य बनेल टेन्शन फ्री ...

आपल्याला या 1500 रुपयाची गुंतवणूक एस आय पी मध्ये करायची आहे दरमहा पंधराशे रुपये गुंतवल्यानंतर आपले एका वर्षात जवळपास 18 हजार रुपये एसआयपी मध्ये जमा होतील , म्हणजेच पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर आपले जवळ जवळ 90 हजार रुपये आपल्या एसआयपी मध्ये जमा होईल. 

आता आपल्याला या 90000 वरती जवळपास पंधरा टक्के दराने परतावा मिळाला तरी 41 हजार 223 रुपये व्याजाच्या स्वरूपात प्राप्त होईल.

थोडक्यात पाच वर्षानंतर आपल्याला एक लाख 31 हजार 253 रुपये रक्कम मिळणार आहे. विशेष म्हणजे मित्रांनो आपण जर ही 1 लाख 31 हजार रक्कम आणखी 5 वर्षांमध्ये Lumsum SIP मध्ये गुंतवणूक केली तर, आपल्याला जवळपास 2 लाख 30 हजार रुपये मिळतील.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment