Close Visit Mhshetkari

Employees Medical bill : खुशखबर… सरकारी कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बिल संदर्भात नवीन शासन परिपत्रक निर्गमित! आता होणार ऑनलाइन …

Employees Medical bill : शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्याकडून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. सर्व ,शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम), मुंबई आणि अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, माध्यमिक, सर्व यांना सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यासाठी परवानगी मिळणे संदर्भात नवीन परिपत्रक निर्गमित केले आहे.

शालार्थ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके

दि. २६/१०/२०२३ रोजीची व्हीसी आणि शासन पत्र क्र. वेतन-१२२३/प्र.क्र.१०१/टिएनटी-३ दि. २० नोव्हेंबर, २०२३ अनुसरून दि. २६/१०/२०२३ रोजी व्हीसीमध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाकडून लेखाशीर्षनिहाय मागणी करण्यात आली होती. तसेच विविध संघटनेकडून मागणी करण्यात आली होती.

तथापि शासन पत्र क्र. वेतन-१२२३/प्र.क्र.१०१/टिएनटी-३ दि. २० नोव्हेंबर, २०२३ अन्वये ऑनलाईन पद्धतीन देयक अदा करण्याची प्रणाली विकसित करण्यास साधारणपणे १ महिन्याचा कालवधी लागणार असल्याने सदर प्रणाली मार्फतच थकीत देयक अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे शासनाने निर्देश दिलेले आहे.

हे पण वाचा ~  7th pay arrears : सातवा वेतन आयोग थकित हप्ता, मेडिकल बील ऑनलाईन दाखल करण्या संदर्भात महत्वाचे परिपत्रक निर्गमित ....

Online medical bill system for employees

सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये सुविधा विकसित करण्याची कार्यवाही सुरू असून शालार्थ प्रणालीमध्ये सदरची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर २२०२०४४२, २२०२०४७८ व २२०२०४६९ या लेखाशीर्षाखाली उपलब्ध तरतूदीमधून वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

सदरची वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ही आपल्या कार्यालयास प्राप्त झालेल्या आवक क्रमांकानुसार अदा करण्याची दक्षता घ्यावी. तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अदा करणेबाबत वित्त विभाग, आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यात यावी. शासनाच्या ध्येयधोरणाच्या विसंगत कार्यवाही केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहीत्र,अशा सुचना प्राप्त झाल्या आहेत.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment