Close Visit Mhshetkari

Gratuity Calculator : कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स! पहा किती आणि कसे मिळणार पैसे?

Gratuity calculator : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ग्रॅज्युटी हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा घटक असतो.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीच्या रकमेमध्ये 20 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यासंदर्भात मागणीवर मुख्य सचिवांसोबत चर्चा झालेली आपल्याला माहिती असेल.तर ही ग्रॅज्युएटी म्हणजे काय ? रक्कम किती मिळते? याबद्दल सविस्तर माहिती आपण लेखांमध्ये बघणार आहोत.

कर्मचारी ग्रॅच्युइटी कायदा 1972

पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी एक्‍ट – 1972 आधारे 10 पेक्षा अधिक कामगार काम करतात त्या प्रत्येक संस्थेमध्ये हा लाभ दिला जातो.जर एखादा कर्मचारी नोकरी बदलतो किंवा सोडून देतो,अशा वेळेस निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांने जर सलग 5 वर्षे सेवा केलेली असल्यास आणि ग्रॅज्युएटीचे नियम पूर्ण केले असतील तर, त्याला ग्रॅच्युटीचा लाभ मिळतो.

एखाद्या कर्मचाऱ्यास आरोग्य समस्यांमुळे अकाली मृत्यू आल्यास,अपंगत्व किंवा निवृत्तीची इच्छा असल्यास कामगारांना रुणता रक्कम दिली जाते.नुकतच सरकारी कर्मचाऱ्यांना जे एनपीएस धारक आहेत त्यांच्यासाठी ग्रॅच्युइटी आणि कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे.

कर्मचारी ग्रॅच्युइटी पात्रता

  • ग्रॅच्युइटीच्या लाभांसाठी खालील पात्रता निकषांमध्ये बसणे आवश्यक आहे.
  • कर्मचारी सेवानिवृत्तीसाठी पात्र असावा आणि कर्मचाऱ्याने नोकरीतून निवृत्त व्हावे
  • एका कर्मचाऱ्याने एकाच नियोक्तासह 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचा राजीनामा दिला असेल तर
  • आजारपणामुळे किंवा अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास
हे पण वाचा ~  Employees gratuity : आता 'या' कर्मचाऱ्यांना नाही मिळणार ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ; नियमात बदल

Employees Gratuity calculator

ग्रॅच्युइटीची गणना कर्मचाऱ्याचा मूळ पगार कर्मचाऱ्याच्या सेवेची वर्षे प्रामुख्याने दोन घटकांवर अवलंबून असते.

ग्रॅच्युईटी फॉर्म्युला – शेवटचा काढलेला पगार X १५/२६ X सेवा वर्षांची संख्या

उदाहरणार्थ :- एखाद्या कर्मचाऱ्याने एका कंपनीत 20 वर्षे काम केले आहे. त्याचा शेवटचा काढलेला मूळ पगार + महागाई भत्ता रु. 30 हजार रूपये असेल तर. अशा कर्मचाऱ्यांना किती मिळेल?

ग्रॅच्युइटीची गणना – 30000 X15 /26 X 20 = 346150 रु. ग्रॅच्युएटी म्हणून दिली जाईल.

Goverment employees gratuity

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस साधारणपणे 14 लाखापर्यंत ग्रॅज्युटी रक्कम दिली जाते. सद्यस्थितीत ग्रॅज्युएटीची रक्कम रक्कम 20 लाख रुपये करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून जोर धरू लागली आहे.

सन 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी कायद्याअंतर्गत ग्रॅज्युटी रक्कम दिली जात नव्हती. परंतु मार्च 2023 मध्ये झालेला सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सरकारने एनपीएस धारक सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देण्यासंदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्यानुसार एनपीएस धारक सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा ग्रॅच्यूटी दिली जाणार आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment