EPFO family Pension : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58-60 वर्षे या दरम्यान असते. एखाद्या कंपनीत 10 वर्षांपर्यंत काम केले तर ती व्यक्ती निवृत्ती वेतनास पात्र ठरते. ही पेन्शन कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर देण्यात येते. जर एखाद्या कर्मचाऱ्याला मृत्यूने लवकर गाठले तर त्याच्या निवृ्त्तीवर पत्नाला दावा सांगता येतो का?
कर्मचाऱ्याच्या पत्नीला निवृत्ती रक्कम देण्यात येते का? भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि इतर अनेक गोष्टींचे व्यवस्थापन करते. कर्मचाऱ्यांना पेन्शनमधून काही रक्कम काढता येते. तर एक ठराविक रक्कम त्याच्या पेन्शन फंडात जमा होते. ती निवृत्तीनंतर त्याला मिळते.
कुटुंबाला किती पेन्शन मिळेल?
EPFO योजनेंतर्गत विधवा, बालक आणि अनाथ पेन्शन देखील उपलब्ध आहे. विधवा पेन्शनमध्ये दरमहा ६,२०० रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. या अंतर्गत आता किमान पेन्शन १००० रुपये आहे. पेन्शनची रक्कम कर्मचाऱ्याने जमा केलेल्या रकमेवर अवलंबून असते. मूल २५ वर्षांचे होईपर्यंत बाल निवृत्ती वेतन दिले जाते. तर मुले अपंग असल्यास त्यांना आजीवन पेन्शन मिळते.
याशिवाय विधवा निवृत्ती वेतनाच्या २५ टक्के रक्कम दिली जाते आणि ती जास्तीत जास्त दोन मुलांना उपलब्ध असते. वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत अनाथ पेन्शनही मिळते पण इथे ७५ टक्के विधवा पेन्शन दिली जाते.
कोणाला मिळेल फॅमिली पेन्शन ?
- ईपीएस स्कीममध्ये सदस्याच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांच्या पत्नीला किंवा पतीला पेन्शन मिळेल
- EPS स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्याला तो जीवित असेपर्यंत दर महिन्याला पेन्शन मिळतं. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला पेन्शन मिळतं.
- कर्मचाऱ्यांच्या 2 मुलांना त्यांच्या 25 वर्षापर्यंत पेन्शन मिळेल.
- कर्मचारी अविवाहित असल्यास त्याच्या नॉमिनीला पेन्शन मिळतं.
- अविवाहित असल्यास किंवा नॉमिनी नसल्यास, कर्मचाऱ्याचा मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांना पेन्शन मिळतं.
पेन्शन प्रमाणपत्र मिळवायचे कसे
- सर्वप्रथम तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाइट http://www.epfindia.gov.in ला भेट द्यावी लागेल. होम पेजच्या उजव्या बाजूला दिलेला ऑनलाइन क्लेम अकाऊंट ट्रान्सफर खाते हस्तांतरणाचा पर्याय निवडा.
- आता तुमच्या स्क्रीनवर UAN पोर्टल उघडेल. तुमचे वापरकर्तानाव (UAN नंबर) आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
- नवीन पेज उघडल्यावर ऑनलाइन सर्व्हिसेसचा पर्याय निवडा.
- काही सेवांची यादी तुमच्या समोर येईल, दाव्याच्या लिंकवर क्लिक करा (फॉर्म 31, 19, 10
- पुढील पृष्ठावर, तुम्हाला तुमच्या वैयक्तिक ओळखीशी संबंधित तपशील प्रविष्ट करावा लागेल. उदाहरणार्थ, नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक.
- येथे बँक खाते क्रमांकासमोर एक रिकामा बॉक्स असेल, ज्यामध्ये तुमचा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा.
- यानंतर, Proceed for Online Claim चा पर्याय खाली दिसेल, त्यावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमच्या पेन्शन खात्यात जमा केलेले पैसे पुढील नोकरीशी जोडायचे असतील, तर स्कीम सर्टिफिकेट (फॉर्म-10 सी) या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर बॉक्समध्ये तुमचा पूर्ण पत्ता टाका.
- यानंतर, तुम्हाला बँकेशी संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील, जसे की पासबुकचे पहिले पान किंवा तुमच्या पीएफशी जोडलेले बँक खात्याचे चेकबुक.
- यानंतर, पेजच्या बुडाशी Get Aadhaar OTP या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर, तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर मिळालेला OTP टाका आणि पडताळणी पूर्ण करा.