DCPS Amount : राज्यातील कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा परतावासाठी एकूण अर्थसंकल्पीत तरतूद रु.८,२१,२७,०००/- पैकी रु.६.२४,०४,५७१/- (अक्षरी रुपये सहा कोटी, चोवीस लाख, चार हजार, पाचशे एक्काहत्तर फक्त) इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे.
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना
विद्यापीठास मंजूर करण्यात आलेले अनुदान महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम १९८३, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ परिनियम १९९०, आणि महाराष्ट्र कृषि विद्यापीठ लेखा संहिता १९९१ मधील तरतूदीप्रमाणे आणि प्रचलित शासन आदेश व विहित कार्यपध्दतीनुसार सक्षम अधिका-यांची प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेतल्यानंतर विहीत मर्यादेत खर्च करण्यात येणार आहे.
- सदर अनुदान कोणत्याही परिस्थितीत स्वीय प्रपंजी लेख्यात / PLA बँक खात्यात ठेवता येणार नाही.
- सदर अनुदान सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातच खर्चासाठी सक्षम स्तरावर मान्यता घेऊनच खर्च करण्यात यावे.
- अर्थसंकल्पीत अंदाजाव्दारे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.
- उपलेखाशिर्षनिहाय, गटनिहाय, योजनानिहाय व बाबनिहाय वितरीत केलेला निधी कोणत्याही कारणास्तव अखर्चित / शिल्लक राहीला / राहणार असेल तर सदर अखर्चित / शिल्लक निधी शासनाचे मान्यतेशिवाय इतर गटांसाठी / योजनांसाठी / बाबींसाठी परस्पर वर्ग करु नये किंवा खर्च करु नये.
- निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच नियोजन व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व प्रचलित अटी व शर्तीचे व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
- ११७- शासकीय कर्मचा-यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (००) (०६) कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थामधील कर्मचा-यांकडून जमा केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाचा परतावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२३११२११६०४१४६४०१ असा आहे.सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.