Close Visit Mhshetkari

Education Policy : राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित; आता शिक्षक भरती प्रक्रिया होणार …

Education Policy : सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे.

शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्हयात काम करावे लागते.तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते.बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शुन्य सेवाजेष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते. 

New Education Policy

प्रचलित शिक्षक भरती मध्ये जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करुन शिक्षक भरतीची उचित कार्यपध्दती सूचविण्याकरीता एक अभ्यास गट नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे अभ्यास गट गठीत करण्यात येत आहे.

आयुक्त, शिक्षण यांना सदर अभ्यासगटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकार असतील.

शिक्षक भरती प्रक्रिया अभ्यास गट

१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे (अध्यक्ष)

२. उपसचिव (शिक्षक व शिक्षकेत्तर), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई २ (सदस्य)

हे पण वाचा ~  Education policy : इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय! शासन परिपत्रक निर्गमित

३. संबधित उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई २ (सदस्य)

४. संबधित उपसचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई (सदस्य)

५. संबधित उपसचिव, ग्राम विकास व पंचायत राज विभाग, मंत्रालय, मुंबई (सदस्य)

६. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे ७. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे (सदस्य सचिव)

समितीची कार्यकक्षा : प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रूटी दूर करुन विभाग वा जिल्हा स्तरावर शिक्षक भरतीकरीता आयुक्त (शिक्षण) यांनी सूचविलेल्या पर्यायांचा अभ्यास करुन सुयोग्य कार्यपध्दतीची शिफारस करणे.

कालावधी : अभ्यास गटाने आपला अहवाल १ महिन्यात शासनास सादर करावा.

खर्चासाठी तरतूद : सदर अभ्यास गटाच्या सदरयाला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या आस्थापनेच्या तरतुदीतून भागवावा लागणार आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment