Close Visit Mhshetkari

7th pay arrears : खुशखबर… सातवा वेतन आयोग फरक,ग्रॅच्युएटी,उपदान मिळणार! शासन निर्णय निर्गमित..

7th pay arrears : राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे सेवानिवृत्ती उपदान, अंशराशीकरण, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता तसेच इतर रकमा माहे एप्रिल २०२१ पासून प्रलंबित असून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनाही दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता जमा करण्याबाबत शिक्षक भारती व अन्य शिक्षक संघटनांकडून मागणी होत होती. शासन निर्णयान्वये आता सातवा वेतन आयोग फरक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सातवा वेतन आयोग फरक मिळणार

सन २०२३ २०२४ या आर्थिक वर्षातील माहे सप्टेंबर २०२३ या ज्ञापनाद्वारे लेखाशिर्ष २२२०२०१७३ / ३६ मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगाचा १ला हप्ता व २ रा हप्तासाठी अदा करावयाची आहे. लेखाशिर्ष २२०२०९७३/०४ मध्ये उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगाचा १ ला हप्ता २ रा हप्ता ३ रा हप्ता व अशराशीकरण, उपदान,Gratuity अदा करावयाची आहे.

सदर ज्ञापनाद्वारे वितरीत केलेल्या तरतूदीपैकी रक्कम शिल्लक राहिल्यास संचालनालयास कळविण्यात येणार आहे.लेखाशिर्ष २२०२०९७३ / ३६ ची तरतूद केवळ शालार्थ प्रणाली मधूनच अदा करण्यात यावी तसेच लेखाशिर्ष २२०२०९७३/०४ ची तरतूद आवश्यक असेल तितकीच बीडीएस प्रणालीवरुन खर्च करण्यात येणार आहे.

7th pay commission news

सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या जेष्ठतेनुसारच (जे शिक्षक आधी निवृत्त झालेले आहेत) त्यांना प्राधान्य क्रमाने १ ला हप्ता २ रा हप्ता ३ रा हप्ता, व अशराशीकरण, उपदान तरतूद अदा करण्यात यावी.उपरोक्त बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे.

हे पण वाचा ~  7th pay Allowance Arrears : मोठी बातमी ! या कर्मचाऱ्यांना मिळणार १ महिन्याचे परिश्रम अनुदान ; शासन निर्णय निर्गमित ....

उपरोक्त रक्कम खर्च झाल्यानंतर त्याचा अहवाल दोन दिवसांत संचालनायास सादर करावा उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे.

7th pay commission installment

ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे.त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-याने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्च मेळाचा प्रेमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा.

वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे, वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच सदरचे ज्ञापन (Scancopy) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ई-मेलवर देण्यात आलेली आहे.

सातवा वेतन आयोग थकबाकी व शासन परिपत्रक येथे पहा 

➡️➡️ 7th pay Arrears ⬅️⬅️

Leave a Comment