Arrears Bill : केंद्र शासनाने सन १९७८ पासून विशेष गरजा असलेल्या अपंग विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) सुरु केली.
सदर योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या तथापि, माध्यमिक युनिटवर कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे एप्रिल,२०२२ ते ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील वेतन दि.३०.११.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अदा करण्यात आले आहे.
Employee Arrears Bill
सदर विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर, २०२३ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीतील वेतन तांत्रिक कारणांमुळे थकीत होते. यास्तव शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी ५२ विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर, २०२३ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये शासनास केली आहे.
१.शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मागणी केल्यानुसार अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या तथापि, माध्यमिक युनिटवर कार्यरत असलेल्या ५२ विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर, २०२३ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्यासाठी रु.५,१४,१९,८५४/- (रु. पाच कोटी चौदा लक्ष एकोणीस हजार आठशे चोपन्न फक्त) इतके अनुदान वितरीत करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
२. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी थकीत वेतनाची रक्कम संबंधित ५२ विशेष शिक्षकांच्या खात्यात जमा करावी. वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्या खात्यात जमा होईल, याची काळजी घावी. एखाद्या शिक्षकाचे नाव दुबार आढळून आल्यास अशा प्रकरणी एकदाच वेतन अदा होईल, याची दक्षता घ्यावी. अधिकचे वेतन अदा झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल.
३. उक्त विशेष शिक्षकांना कोणत्याही न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने नोव्हेंबर, २०२३ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीसाठी यापूर्वी वेतन अदा करण्यात आले असल्यास सदर शासन निर्णयातील परिच्छेद १ मध्ये नमूद केल्यानुसार परिगणना करुन अनुज्ञेय होणा-या रकमेतून सदर रक्कम समायोजित करुन उर्वरित रक्कम अदा करण्यात यावी.
४. विशेष शिक्षकांना अदा करण्यात आलेल्या वेतनाची वसूली सदर शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात शासन स्तरावर घेतल्या जाणा-या अंतिम निर्णयाच्या अधीन असेल, अशा आशयाचे बंधपत्र, वेतन अदा करताना संबंधित विशेष शिक्षकाकडून घेण्यात यावे.
उपरोक्तप्रमाणे वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा. शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्वपरवानगी घेण्यात यावी. वितरीत करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे.
५. सदर खर्च “मागणी क्रमांक ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, १०६- शिक्षक व इतर खर्च, (०१) (०२) समग्र शिक्षा अभियान (सर्वसाधारण) (राज्य हिस्सा ४० टक्के), ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२०२ आय ६१२) या लेखाशिर्षाखालील सन २०२४-२५ या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात येईल.
सहसचिव / उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना “नियंत्रक अधिकारी व अवर सचिव / कक्ष अधिकारी, रोख / लेखा शाखा, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना “आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
५. संबधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर निधी कोषागारातून आहरीत करुन राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषद, मुंबई यांच्या बँक खात्यात (SNA) जमा करावा. सदर निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषद, मुंबई यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कडे सुपूर्त करावा लागणार आहे.
६. सदर प्रकरणी शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी तातडीने कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्यांच्या स्तरावर आढावा घेऊन दर १५ दिवसांनी शासनास सादर करावा लागेल.