Close Visit Mhshetkari

Gold Rules Maharashtra: सुवर्ण नियंत्रण कायदा काय आहे?घ्या जाणून माहिती

Gold Rules Maharashtra: नमस्कार मित्रांनो, सर्वच नागरिक सोन्याला मौल्यवान धातू म्हणून ओळखतात. त्याचबरोबर या धातूच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचबरोबर आपल्या भारतात सणांच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.

त्याचबरोबर सणासुदीला विकत घेतलेले सोने अनेक व्यक्ती आपल्या घरातच साठवून ठेवतात. परंतु, सोनू घरामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला काही सरकारी नियमांचे पालन करावे लागते. त्याच बरोबर सरकारने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त घरात सोनं ठेवणं हा एक गुन्हाच आहे. 

इतकंच सोनं घरी ठेवा

घरात सोनं ठेवण्यावर सरकारनं मर्यादा आणल्या आहेत.  तेव्हा असा प्रश्न उद्भवतो की आपण घरात किती सोनं ठेवू शकतो? तर सरकारी नियमांनुसार विवाहित महिला 500 ग्रॅम म्हणजे पन्नास तोळं सोनं ठेवू शकते.

अविवाहित महिला 250 ग्रॅम सोनं ठेवू शकते. कुटुंबातील पुरुष सदस्यांसाठी ही मर्यादा 100 ग्रॅम म्हणजे दहा तोळं इतकी आहे. याशिवाय, कोणत्याही मर्यादेपर्यंत दागिने कायदेशीररित्या ठेवणं पूर्णपणे सुरक्षित आहे. , जोपर्यंत सोनं उत्पन्नाच्या स्पष्ट स्त्रोतांमधून खरेदी केले गेलं आहे. तोपर्यंत सोन्याच्या साठवणुकीला कोणतीही मर्यादा नाही.

 Gold Control Act update 

देशातील सुवर्ण नियंत्रण कायदा  इतिहासजमा झाला आहे. पण घरात तुम्ही किती सोने ठेऊ शकता, याविषयी काही मर्यादा आहेत. घरात जास्त सोने असल्याची कुणकुण लागल्यावर खरंच प्राप्तिकर खात्याची धाड पडू शकते का? जर कायदा अस्तित्वात नाही तर मर्यादा किती आणि कारवाई काय होऊ शकते? असे अनेक प्रश्न उपस्थित होता. केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क मंडळाने याविषयीचे परिपत्रक जाहीर केले आहे.

सोन्यावर कर कधी भराव लागतो?

तुम्ही सोने खरेदी केल्यापासून तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत विकायचे ठरवले, तर त्यावर आयकर स्लॅब दरांवर अल्पकालीन भांडवली नफा कर लागू होती. तर खरेदीनंतर तीन वर्षांहून अधिक काळ सोने विकले गेल्यास, त्या विक्रीवर दीर्घकालीन भांडवली नफा कर द्यावा लागत नाही.

सोने खरेदीवर कर नाही!

आता यापुढे Gold वर कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनुसार  जर एखाद्या व्यक्तीने उत्पन्न उघड केले असेल, कृषी उत्पन्नासारखे सवलत दिलेले उत्पन्न असेल किंवा पात्र घरगुती बचत किंवा कायदेशीररित्या वारसा मिळालेल्या उत्पन्नातून सोने खरेदी केले असेल तर ते कराच्या अधीन नाही.

नियमांमध्ये असेही म्हटले आहे की शोध मोहिमेदरम्यान, अधिकारी घरातून सोने दागिने किंवा दागिने जप्त करु शकत नाहीत, जर ते प्रमाण विहित मर्यादेत असेल

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment