Green FD Plan : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की भारत वेगळे प्रगती करणारा देश आहे.अशामध्ये विकसित होण्याच्या दृष्टीने वेगळा क्षेत्रामध्ये काम चालू आहे.
आता बँकांकडून सुद्धा हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी वित्तपुरवठा करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.बँकांनी Green FD Scheme सुरू केली आहे.
What is Green Deposit ?
ग्रीन एफडी (Green FD) साधारण मुदत ठेव (Fixed Deposit) सारखी असते.ग्रीन एफडी गुंतवणूक योजना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायदा 1961 अंतर्गत समाविष्ट आहेत.ग्रीन एफडीमध्ये सुरक्षिततेची हमी मिळते आणि पैसे गमावण्याचा धोका नसतो.
सध्या SBI,Central Bank,AU Bank मध्ये Green FD Plan तर्फे सदरील योजना चालू आहे.मित्रांनो,सध्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये मुदत योजना म्हणजे फिक्स डिपॉझिट हा लोकप्रिय प्रकार मानला जातो.भविष्याकडे वाटचाल करत असताना वापरात येणाऱ्या साधनांमध्ये सुद्धा बदल होत असतात.
विविध उपकरणांमध्ये हरित ऊर्जेचा वापर केला जातो आहे.सगळ्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध बँकांनी ग्रीन एफडी स्कीम सुरू केली आहे.
Bank FD मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम हरित ऊर्जे संबंधित प्रकल्पासाठी वापरली जाते,शिवाय यामध्ये गुंतवणुकी दारांना वित्तीय सुरक्षा व नैतिक गुंतवणुकीचा लाभ सुद्धा मिळत असतो.
थोडक्यात सांगायचे झाले तर, विकास आणि उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणारे प्रकल्प किंवा कंपन्यांच्या वित्तपुरवठ्यासाठी या मुदत ठेवींचा वापर केला जातो.
SBI Green Deposit Rupee
- मुदत : 1111 दिवस, 1777 दिवस आणि 2222 दिवस
- व्याज दर:
- सामान्य गुंतवणूकदार : 6.65% (1111 दिवस), 6.65% (1777 दिवस), 6.40% (2222 दिवस)
- ज्येष्ठ नागरिक : 7.15% (1111 दिवस), 7.15% (1777 दिवस), 7.40% (2222 दिवस)
Central Bank Green Deposit
- मुदत: 1111 दिवस, 2222 दिवस आणि 3333 दिवस
- व्याज दर : सर्व गुंतवणूकदार: 5.90% (1111 दिवस), 6.00% (2222 दिवस), 6.10% (3333 दिवस)
AU Green Fixed Deposit
- मुदत : 1 वर्ष ते 10 वर्षे
- व्याज दर:
- 12 महिने: 6.75%
- 18 महिने: 8%
- 36 महिने: 7.50%
- 60 आणि 120 महिने: 7.25%
सर्वात जास्त व्याज दर AU Small Finance Bank देते.
SBI आणि Central Bank ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अतिरिक्त व्याज देतात.
SBI 1111 आणि 1777 दिवसांसाठी सर्वात जास्त व्याज दर देते तर Central Bank 3333 दिवसांसाठी सर्वात जास्त व्याज दर देते.
टीप : – सदरील व्याज दर बदलू शकतात,त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी बँकेच्या वेबसाइटला भेट द्यावी.