Tax on GPF : भविष्य निर्वाह निधी वर्गणी व थकबाकी रक्कमे संदर्भात आयकर विभागाची नवीन नियमावली ! शासन निर्णय निर्गमित …

Tax on GPF : भारत सरकार, कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय (पेन्शन आणि पेन्शन भोगी कल्याण विभाग) यांच्या दिनांक १५/६/२०२२ च्या अधिसूचनेच्या धर्तीवर, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ आयकर संदर्भात काही नियम करण्यात आले आहेत.

Income tax on Provident Fund 

“वित्तीय वर्षातील नियमित वर्गणी व थकबाकी मिळून येणारी रक्कम आयकर नियमावली, १९६२ च्या नियम ९ (घ), उप नियम (२) च्या खाली दिलेल्या रपष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड (1) मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक नसेल अशी सुधारणा दिनांक १८/०४/२०२३ च्या अधिसूचनेन्यये करण्यात आली आहे.

सदर अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी दिनांक १/१२/२०२३ च्या परिपत्रकान्वयेसद्यस्थितीत रु. पाच लाख सिमित ठेवण्याबाबतसविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा ~  Income tax : आयकर विभागाचे या व्यवहारावर बारीक लक्ष! पहा नविन नियम; नाहीतर येईल नोटीस!

सदरील बदलाच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सूचित करण्यात येते की, सदर परिपत्रकात दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घेण्याबाबत सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४०४०२१७५०२८३१०७ असा आहे. हे आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.

Leave a Comment