Close Visit Mhshetkari

Home Loans : घर खरेदीसाठी पैसे खिशात असताना सुद्धा का घेतात लोक गृहकर्ज ? पहा फायद्याचे गणित

Home Loan : नमस्कार मित्रांनो आपले एक स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. सामान्य कुटुंबापासून मध्यमवर्गांसाठी घर खरेदी करणे म्हणजे मोठे जिकरीचे काम असते. अशा वेळेस आपण बँकेकडून गृह कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतो.

मित्रांनो आपल्याला माहिती आहे का, पुरेसा पैसा असताना सुद्धा बरेच लोक गृह कर्ज निवडतात. याचे कारण काय आहे आणि गृह कर्जाचे फायदे काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत …

Home loan Benefits

मित्रांनो अनेकजण पुरेसा पैसा असताना सुद्धा गृह कर्ज घेण्याचा निर्णय घेतात यामुळे बरेच लोक बुचकळ्यात पडतात, याचे कारण अनेक असतात.

विवादित मालमत्ता : गृहकर्ज घेतल्याचा पहिला फायदा म्हणजे, आपण ज्या मालमत्तेवरती कर्ज घेणार आहोत, त्या मालमत्तेची सखोल चौकशी बँकेद्वारे केली जाते सर्च रिपोर्ट बरोबर इतर महत्त्वाची कागदपत्र बँकेकडून पाहिले जातात. त्यामुळे आपली मालमत्ता विवादित नाही ना? त्याच्यावरील तर कोणताही कर्ज किंवा घोळ नाही ना याची खात्री कर्ज घेतल्यानंतर होते.

हे पण वाचा ~  Home loan Agrim : मोठी बातमी ! राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरबांधणी संदर्भांत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित ...

आयकर सुट : आपल्याला माहिती आहे की आयकर भरणे मोठे डोकेदुखी सामान्य वर्गासाठी झालेली आहे. अशा वेळेस गृह कर्ज घेतल्यानंतर करदात्याचा बराचसा टॅक्स वाचतो.आयकर अधिनियम कलम 24(b) अंतर्गत व्याजदरावर प्रत्येक आर्थिक वर्षात 2 लाख रुपयांची सवलत मिळते. कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.

विशेष म्हणजे पती-पत्नी मिळून संयुक्त खात्यातून कर्ज घेतले असेल तर या दोघांना पण कर सवलतीचा फायदा मिळतो. 

होम लोन टॉप-अप : मित्रांनो, आपण घेतलेल्या गृहकर्जावर बँकांकडून ठराविक कालावधीनंतर “होम लोन टॉप अप” देण्यात येते. ज्यामुळे आपल्याला अडचणीच्या काळात स्वस्त व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. विशेष म्हणजे यासाठी कागदपत्र व इतर क्लिष्ट बाबींची अडचण निर्माण होत नाही.

Leave a Comment