Family pension : भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तिवेतन नियम, १९८२ ला सुधारणा करणारे पुढील नियम केले आहेत.
Family Pension Scheme
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ याच्या नियम ११६ मधील, पोट-नियम (५) मध्ये, (अ) खंड (तीन) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात आले आहेत.
अविवाहित मुलीच्या बाबतीत (मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीव्यतिरिक्त), ती चोवीस वर्षे वयाची होईपर्यंत किंवा तिचा विवाह होईपर्यंत, यांपैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अथवा विधवा किंया घटस्फोटित असलेल्या व ती स्वतःची उपजिविका करत नाही अशा मुलीच्या बाबतीत पुढीप्रमाणे बदल करण्यात आला आहे.
शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्युपूर्वीच अस्तित्वात असलेली विकलांगता.
जेव्हा मयत शासकीय कर्मचारी किंवा निवृत्तिवेतनधारक त्याच्या पश्चात खंड (एक) किंवा खंड (दोन) किंवा खंड (तीन) अन्वये कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र असलेलो विधवा किंवा विधुर किंवा मुलगा किंवा मुलगी नसेल त्याबाबतीत कुटुंब निवृत्तिवेतनासाठी पात्र असलेली विधवा किंवा विधुर किंवा मुलगा किंवा मुलगी मृत पावली असेल तर विहित केलेल्या कुटुंब निवृत्तिवेतनास पात्र राहणार नसेल तर,
अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलीला, चोवीस वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजिविकेस सुरुवात करीपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत कुटुंब निवृत्तिवेतन, मंजूर करण्यात येईल किंवा नियमितपणे प्रदेय होईल.
महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन
1) शेवटचे अपत्य विहित वयाचे होईपर्यंत निर्धारित केलेल्या क्रमानुसार अपत्यांना प्रथम कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय असेल;
2) कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यासाठी विकलांगता असलेले पात्र अपत्य.
3) अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी जेव्हा, तो किंवा ती किंवा ते हयात होते तेव्हा, तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून होती.
4) जेव्हा मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या माने चोवीस वषपिक्षा अधिक चच असलेल्या एकपेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुली असतील तेव्हा, जी मुलगी, त्याच्या जन्मक्रमानुसार या पोट-नियमान्वये कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करण्याच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करील अशा मुलोला, प्रथम कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय होईल.
5) सर्वात मोठी मुलगी, तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजिविकेस सुरुवात करीपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत, कुटुंब निवृत्तिवेतनास हक्कदार असेल आणि सवांत धाकटी मुलगी, तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर किंवा पुनर्विवाह झाल्यानंतर किंवा तिच्या उपजिविकेस सुरुवात केल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर, कुटुंब निवृत्तिवेतनास पात्र होईल.
6) विधवा मुलीच्या बाबतीत, तिच्या पतीचा मृत्यु किंवा घटस्फोटित मुलौच्या बाबतीत, शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत घटस्फोट झाल्यासः परंतु, जर घटस्फोटाची कार्यवाही, शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल, परंतु, त्यांच्या मृत्युनंतर घटस्फोट झाला असेल तर, घटस्फोटित मुलीला, घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय राहणार आहे.
7) मुलीचा ज्या तारखेस विवाह होईल” या मजकुरा अगोदर, “मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीखेरीज,” हा मजकूर दाखल करण्यात येईल.