Close Visit Mhshetkari

Retirement age : पहा आपल्या गावातील अंगणवाडी सेविका कधी होणार रिटायर्ड! नवीन नियम आला …

Retirement age : एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत दिनांक ३० नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये नोव्हेंबर २०१८ पासून नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाड्यांच्या एकत्रिकरणानंतर मदतनीसाची अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक केल्यास त्यांची मानधनी सेवा ६० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

अंगणवाडी सेविका सेवानिवृत्ती वय

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचा-यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाचा ३० एप्रिल हा निश्चित करण्याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.

सबब, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीबाबत दिनांक ३०.११.२०१८ व दिनांक ०२.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करताना खालील कार्यपध्दतीचा अवलंब करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

हे पण वाचा ~  Retirement Age : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृतीचे वय 60 वर्षे संदर्भात महत्त्वाची अपडेट्स समोर! पहा सविस्तर

Retirement age new rule

१) ज्या अंगणवाडी कर्मचा-यांचा कार्यालयातील नोंदीनुसार जन्म दिनांक १ जानेवारी ते दिनांक १ मे (दोन्ही दिवस धरून) या कालावधीतील असेल त्यांना त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३० एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्यात यावे.

२) ज्या अंगणवाडी कर्मचा-यांचा कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक दिनांक २ मे ते दिनांक ३१ डिसेंबर (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान असेल त्यांना पुढील कैलेंडर वर्षाच्या ३० एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्यात यावे.

सदरील कार्यपध्दतीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून कार्यवाही करण्यात यावी. याबाबतच्या सविस्तर सूचना आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment