Employees increments : नमस्कार मित्रांनो कर्मचारी बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेले असून आपल्याला माहिती असेल की राज्य सरकारने 2009 मध्ये अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन वाढ देण्याचा निर्णय घेतला होता.
सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक २४ ऑगस्ट, २०१७ अन्वये राज्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना अतिक्रुष्ट अन्वये राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्यात येवू नयेत शासन निर्णय घेण्यात आला होता.
Extra Increment for employees
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ राज्यातील जिल्हा परिषद मधील सरकारी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सुद्धा अति उत्कृष्ट कामासाठी आगाव वेतन वाढ न देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आला होता.
आदर्श जिल्हा पुरस्कार देऊनही वेतनवाढीचे फायदे सहाव्या वेतन आयोगात न दिल्याने शिवाजी खरात व इतर 25 ग्रामसेवकांनी एडवोकेट शिवकुमार मठपती यांच्या मार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
आगाऊ वेतनवाढ मिळणार!
सदरील याचिकेवरती सुनावणी होऊन याचिकेतील सदस्य ग्रामसेवक यांना एका वेतन वाढीचे फायदे देण्याच्या वेळेस वसूल केलेली रक्कम परत करण्यात यावी,तसेच जे आदर्श ग्रामसेवक 24/8/2017 पर्यंत वेतन वाढीसाठी पात्र असतील त्यांनाही वेतन वाढीचे फायदे पुढील चार आठवड्यात देण्यात यावेत असा निकाल औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी दिला होता.
Goverment employees update
आता महाराष्ट्र राज्य वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ मा.उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्रमांक ९६०२/२०२१, ११८४६/२०२१, २८५७/२०२१ आणि ३२००/२०२१ मध्ये दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी दिलेल्या अंतिम निर्णय निर्गमित करण्यात आला.
आता जिल्हा परिषदेतील आदर्श ग्राम सेवक पुस्कार प्राप्त ग्राम सेवक/ ग्राम विकास अधिकारी यांना एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करणे बाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्याकडून दिनांक १० मे, २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. परिणामी आदर्श पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांना एक आगाऊ स्वरूपाची वेतन वाढ देण्यात येणार आहे.