Untrained employees : महाराष्ट्र राज्यातील अप्रशिक्षित म्हणून रूजू झालेल्या शिक्षकांना नियुक्तीच्या दिनांकापासून सेवेचे लाभ मिळणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या मार्फत दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन परित्रक निर्गमित करण्यात आले आहे.
अप्रशिक्षित कालावधी ग्राह्य धरणार?
राज्यात पुर्वी मागास प्रवर्गाचे प्रशिक्षित उमेदवार मिळत नसल्यामुळे अप्रशिक्षित शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.सेवेत असतांना ते प्रशिक्षित झाले आहेत.सदर शासन परिपत्रकांनुसार राज्यातील अप्रशिक्षित शिक्षकांना नियुक्तीच्या दिनांकापासूनच सेवेचे लाभ मिळणे संदर्भात सुचना देण्यात आलेल्या आहेत.
मित्रांनो यापूर्वी महाराष्ट्रामध्ये विविध संवर्गनिहाय रिक्त पदांचा बॅकलॉग भरण्यासाठी बारावी बेस वरती शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या. अशा शिक्षकांना अप्रशिक्षित वेतनश्रेणी अदा करण्यात येत असे, या शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना प्रशिक्षित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आला होता.
Untrained employees Service Benifits
कालांतराने वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीसाठी हा प्रशिक्षित कालावधी ग्राह्य धरणे संदर्भात मागणी करण्यात आली होती.अप्रशिक्षित शिक्षक म्हणून नियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून निवड व वरिष्ठ श्रेणीसाठी नियुक्ती दिनांक ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्ती असल्यामुळे जुनी पेन्शन योजना लागु करणे तसेच इतर सेवा विषयक लाभ अनुज्ञेय करण्याचे निर्देश सदर शासन परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.