Salary budget : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून दिवाळीच्या मुहूर्तावरती ऑक्टोबर महिन्याचा पगाराचा संदर्भात अनुदान प्राप्त झाले आहे. आता संबंधित महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे बघूया कोणत्या जिल्ह्याला किती अनुदान प्राप्त झाली आहे.
Employees salary budget
माहे ऑक्टोबर 2023 च्या प्राथमिक, माध्यमिक व केंद्रप्रमुख सर्व जिल्हा परिषद तसेच खाजगी (शिक्षण विभाग) साठीचे वेतन निधी विनियोजन महाराष्ट्र शासन वित्त मंत्रालयाकडून शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडे प्राप्त झालेले होते.
जिल्हानिहाय वेतनासाठी शिक्षण संचालनालयाकडून निधी वितरण दिनांक 23-10-2023 रोजी झालेले असून जिल्हा परिषदेस प्राथमिक शिक्षक वेतनासाठी वेतन तरतूद मान्य झाली आहे.माहे – ऑक्टोबर 2023 साठी वेतन तरतूद प्राप्त झालेली असल्याने ऑक्टोबर 2023 चे वेतन दिवाळीपूर्वी होणार आहे.
दिवाळी पूर्वीच वेतन व अग्रिम
सन २०२३ २०२४ या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोंबर २०२३ या महिन्याचा वेतन व भत्ते निवृत्तीवेतन याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर निधी प्राप्त झाला आहे.
माहे ऑक्टोबर २०२३ वेतन अनुदान शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
आता तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदायांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आली आहे.
सण अग्रिम रकमेत वाढ
सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने यावर्षी 12,500 रुपयांचं सण अग्रीम देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांकडून संमती पत्र भरून घेण्यात आलेला आहे. सदरील रक्कम दिवाळीपूर्वी मिळणार असल्याची माहिती मिळालेली आहे त्यामुळे दिवाळी सणानिमित्त कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.
दिवाळी सण अग्रीम रक्कम ही पूर्वी इतकीच आहे त्यात वाढ़ कुठे झाली आहे..
असली तुटपुंजी रक्कम सण अग्रीम कशाला देता, बर ती परत पण घेतात 10-12 महिन्याच्या हप्त्यात काटून, मग काय फायदा ते देण्याचा. सरळ सरळ एक महिन्याचा बोनस द्यावा.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!