Good news : जिल्हा परिषद पदवीधर प्राथमिक शिक्षक संवर्गातून सेवाज्येष्ठता / गुणवत्ता व सामाजिक आरक्षण या निकषांवर पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापकांना ग्राम विकास विभागाच्या दिनांक १८ नोव्हेंबर, १९८८ व्या शासन निर्णयानुसार पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हे पदनाम निश्चित करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक १४ नोव्हेंबर, १९९४ अन्वये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी केंद्रप्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी अपडेट्स
मुख्याध्यापक,पदवीधर, प्राथमिक शिक्षक पदवीधर अथवा केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर,पदोन्नती स्विकारल्यानंतरचे वे’तन निश्चित करताना,महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१) तरतुदीनुसार एक वेतनवाढ देवून त्याची वेतन निश्चिती करण्यात येणार होती.
प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदाचे उपरोक्त नमूद कामकाज लक्षात घेता,पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते.
वरच्या पदाच्या समयश्रेणी मिळणार
सध्या प्राथमिक पदवीधर शिक्षक हा त्यास संबंधित शाळेत नेमूण दिलेल्या विषयाच्या अध्यापनापुरता मर्यादित असतो.इयत्ता ६ ते ८ मधील विशिष्ट विषयांचे अध्यापनाचे कामापुरता मर्यादित असतो.
केंद्रप्रमुखास जिल्हा परिषदेच्या दहा शाळांचे पर्यवेक्षण व साप्ताहीक सहा तासांचे किमान अध्यापन करणे बंधनकारक आहे.पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हा शाळेचे संपूर्ण व्यवस्थापनासाठी जबाबदार असून त्यांना दर आठवडयात किमान १८ तास अध्यापन करणे बंधनकारक आहे.उर्वरित कालावधी त्याला संबंधित शाळेचे प्रशासन व संनियत्रण हाताळावे लागते.
आता वर्ग दोनच्या पदापेक्षा वरच्या दर्जाचे नसलेले पद तो धारण करित असेल तर, त्याचे वरच्या पदाच्या समयश्रेणीतील प्रारंभिक वेतन हे खालच्या पदाच्या ज्या टप्प्याला त्याचे वेतन असेल त्या टप्प्याला एक वेतनवाढ मिळवल्यानंतर, आणि वे’तनमानातील कमाल वे’तन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत मागील वेतनवाढीइतकी रक्कम मिळाल्यावर जे मानीव वेतन येईल त्याच्या पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येईल.
संबंधित आगाऊ स्तर शासन निर्णय येथे डाऊनलोड करा