Close Visit Mhshetkari

Bank loan : बापरे.. बॅंकेकडून आपल्याला मिळू शकते 10 प्रकारचे कर्ज ! पहा यादी

Bank Loan : मित्रांनो आपल्याला माहिती असते की अडीअडचणी या काळामध्ये आणि एखादी मोठी वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला बँकेची किंवा बँक कर्जाची गरज पडत असते.थोडक्यात आपण बँक कर्ज घेऊन आपली गरज भागवत असतो.मोठी वस्तू जागा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असतो.आर्थिक संकटांमध्ये अडकलेले असताना ही बँकच तुम्हाला मोठी मदत करते.

बँकेत सुद्धा आपल्याला थोड्याच प्रकारच्या कर्जांची माहिती असते मित्रांनो बँकेत अशा प्रकारची कर्ज मिळू शकते, याचा विचार आपण आतापर्यंत केलेला नसेल.तुमच्या गरजा सहज भागू शकते अशा कर्जाची माहिती आपण या लेखांमध्ये सविस्तर बघणार आहोत.

बॅंक कर्जाचे विविध प्रकार

पर्सनल लोन :- वैयक्तिक कर्ज बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या कर्जातून मिळणाऱ्या पैशांचा वापर तुम्ही कुठंही करू शकता तुमची मिळकत आणि क्रेडिट स्कोअर तपासून हे कर्ज दिले जाते.

बिजनेस लोन : – एखादा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांसाठी हे कर्ज दिले जाते. यासाठी बँकेकडे काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे अपेक्षित असते.

सॅलरी ॲडवांस कर्ज : – बँकेकडून ग्राहकांसाठी सॅलरी ॲडवांस लोनही ग्राहकांना दिले जाते. यामध्ये पगाराचे पैसे आगाऊ मिळतात. अडचणीच्या वेळी बँकेची ही सुविधा मदतीची ठरते.

कोलॅटरल लोन :- आपल्या मालमत्तेचा काही भाग,FD किंवा सोने गहाण ठेवून तुम्हाला हे कर्ज घेता येते.

मेडिकल लोन :- दवाखान्यातील खर्चापासून ते आजारपणावरील उपचारांपर्यंतचा खर्च या कर्जातून करता येतो. वैद्यकिय कारणांसाठी सदरील मेडिकल लोन बँक देते.

वेडिंग लोन :- आपल्याला नवल वाटेल, लग्नाचा खर्च करण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैशांची चणचण भासतेय, तर अशा वेळी बँक तुम्हाला कर्ज देते. कर्जाच्या पैशांतून आपण वेन्यू बुकिंग, कॅटरिंग, डेकोरेशन असे खर्च करु शकता.

हे पण वाचा ~  RBI Repo Rate : आपला EMI,व्याजदर,तसेच UPI पेमेंट संदर्भात RBI कडून मोठी घोषणा! पहा रिझर्व्ह बँक बैठकीतील मुद्दे

रेनोवेशन लोन :- आपल्या घराची,कार्यालयाची दुरुस्ती किंवा अशा इतर कामांसाठीही बँकेकडून कर्ज घेता येते.

शॉर्ट टर्म लोन :- बँकेकडून दिल्या जाणाऱ्य़ा या सवलतीमध्ये तुम्हाला अचानक ओढवलेल्या संकटातून सावरण्यासाठी मदत होते. या कर्जांवर व्याजदर जास्त असतो. त्यामुळे हे एक अनसिक्योर्ड पर्सनल लोन आहे.

Personal loan New offers

Travel loan :- आपल्याला आश्चर्य वाटेल,आपल्याला फिरायला जाण्यासाठी सुध्दा बँक कर्ज देते. आपण जर कुठे फिरण्याचा बेत आखत असाल तर बँक आपल्याला ट्रॅवल लोन देऊ करते. या पैशांतून तुमचा फ्लाईट खर्च, व्हिसा, वास्तव्याचा खर्च भागवू शकता.

Education loan :-विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीसुद्धा बँकेकडून कर्ज दिले जाते. शालेय,महाविद्यालयीन शिक्षण खर्च, व्यवसाय शिक्षण,परदेशातील शिक्षण असे खर्च समाविष्ट असतात.

Gold loan :- आपणास माहित असलेले हे कर्ज असून बँकेकडून सोने तारण ठेवून ग्राहकांना गोल्ड लोन दिले जाते.आपण सोने तारण ठेवून बँकेकडून कर्जाऊ पैसे घेऊ शकता. सोने तारण कर्ज हे बाजारभावाच्या 70 % मिळते.

सदरील बॅंक कर्जां शिवाय Bank ग्राहकांना रिपेअरिंग लोन,यूज्ड कार लोन,होम लोन,ऑटो लोन, क्रेडिट कार्ड लोन देत असते. वेगवेगळ्या बँका त्यांच्या interest rate नुसार कर्ज देत असतात. त्यामुळे इथून पुढे वारेमाप खर्च करताना आर्थिक चणचण भासल्यास योग्य कर्ज प्रकार निवडा.

बॅंक कर्ज घेण्यासाठी आपला सिबिल स्कोअर येथे पहा, कमी असेल तर असा वाढवा

➡️➡️ Cibil Score ⬅️⬅️

Leave a Comment