Dearness allowance : मोठी बातमी.. आता ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी 4% वाढ! वेतन आयोग फरक, सण अग्रीम पण..

Dearness allowance : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांनी नुकताच 11 सप्टेंबर पासून संपाची हाक पुकारली होती.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने सदरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

आता आणखी महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक आठवड्यात दोनदा मागे भत्त्यात वाढ झालेली आहे.

महागाई भत्त्यात आणखी 4 टक्के वाढ

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली होती.आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 % वरुन 42 % करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

दोन दिवसांपूर्वीच महागाई भत्ता 34 टक्यावरून 38% करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला होता,परंतु कर्मचाऱ्यांनी आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने महागाई भत्त्यात पुन्हा चार टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय दिले जाते. आता महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 18 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. विशेष म्हणजे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 212 % महागाई भत्ता वाढ देण्यात येणार आहे.

हे पण वाचा ~  7th Pay committee : सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन ...

7th pay commission arrears

  • सप्टेंबर पेड इन ऑक्टोबरच्या वेतनापासून महागाई भत्ता 34 % टक्क्यांवरून 42 % करण्यात येईल.
  • सर्व थकबाकीसंदर्भात १५ दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री, उद्योगमंत्री व एसटी कामगार संघटनेसमवेत चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहे.
  • सण अग्रीम १२,५०० रुपये मूळ वेतनाची अट न घालता दिले जाईल
  • एसटी कामगारांना आयोग देणे, एकतफा वेतनवाढीतील रु ९/- कोटींमधील उर्वरित रक्कम
  • मूळ वेतनातील रु.५०००/-, ४००० /- व २५०० / – मधील तफावती दूर करण्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.

2 thoughts on “Dearness allowance : मोठी बातमी.. आता ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी 4% वाढ! वेतन आयोग फरक, सण अग्रीम पण..”

Leave a Comment