Dearness allowance : खुशखबर.. ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Dearness allowance : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या केली आहे.

महागाई भत्त्यात 4 % वाढ

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 % वरुन 38 % करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय दिले जाते. आता महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. विशेष म्हणजे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 212 % महागाई भत्ता वाढ देण्यात येणार आहे.

7th pay da allowance

सध्या देशातील केंद्रीय कर्मचारी जुलै महिन्याच्या DA hike ची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता वाढवण्याच्या घोषणेच्या तारखेला कोणतीही अधिकृत पुष्टी मिळाली नाही, परंतु मीडिया रिपोर्टनुसार असा अंदाज लावत आहेत की सप्टेंबर 2023 मध्ये निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा ~  7th Pay Arrears : खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबरच्या पगारात मिळणार सातवा वेतन आयोगाचा थकीत हप्ता शासन परिपत्रक निर्गमित

देशातील किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमध्ये 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला असल्याने, अहवालानुसार, सरकारने डीए 3% पॉइंटने वाढवून 45% करणे अपेक्षित आहे. १ जुलै २०२३ पासून महागाई भत्त्याची वाढ लागू होणार आहे.

Leave a Comment