DA chart : केंद्र सरकारच्या वतीने सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या DA आणि DR ची घोषणा सप्टेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे.डीए वाढ संदर्भातील घोषणा येत्या दोन दिवसांतही केली जाऊ शकते.
DA calculator chart
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 42 % महागाई भत्ता मिळतो.ऑलइंडिया कन्झूमर प्राईज इंडेक्स आणि कंझ्युमर फूड प्राईज इंडेक्सने जारी केलेल्या डेटानुसार महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढू शकतो.अर्थात कर्मचाऱ्यांच्या डीए आणि डीआर 46% होऊ शकतो. यासंबंधीचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ घेणार आहे.
देशात सुरू असलेल्या महागाईवर लक्ष ठेवून सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली आहे. ही डीए वाढ AICPI निर्देशांकाच्या आधारे निश्चित केली जाते.AICPE निर्देशांकाच्या आधारे, सरकार महागाई भत्त्यात 4% पर्यंत वाढ करू शकते.
लेबर मिनिस्ट्रीकडून जुलै महिन्यासाठीचा AICPI इंडेक्स 31 ऑगस्टला जारी करण्यात येणार आहे.मागील काही वर्षांतील भत्त्यात वाढ पाहिली तर जानेवारी 2021 मध्ये 28%, जुलै 2021 मध्ये 28%, जुलै 2022 मध्ये 31%, जुलै 2022 मध्ये सुमारे 34% आणि जानेवारी 2023 मध्ये 42%, केंद्रीय कर्मचार्यांना महागाई भत्त्याच्या आधारावर पगार दिला जातो होता आहे.
HRA allowance news
महागाई भत्त्यासोबत कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये सुध्दा वाढ होणार आहे.पण, महागाई भत्ता ज्यावेळी 50 % चा आकडा ओलांडेल तेव्हाच ही वाढ होणार आहे.थोडक्यात यासाठी किमान 6 महिन्यांचा वेळ लागू शकतो.
घरभाडे भत्ता श्रेणी बघायची तर ‘ X’ म्हणजे 50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या शहरातील कर्मचाऱ्यांना 24% दराने, ‘Y’ म्हणजे 5 लाख ते 50 लाख लोकसंख्या शहरातील कर्मचाऱ्यांना 16 % तर जेथे लोकसंख्या 5 लाखांपेक्षा कमी आहे अशा Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 8% दराने घरभाडे भत्ता मिळतो.