Salary Budget : सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे ऑगस्ट वेतन अनुदान संदर्भात महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित; या जिल्ह्याचा समावेश!

Salary Budget : राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनअनुदान संदर्भात महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.आता ऑगस्ट महिन्याचे वेतन वेळेत करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल.

Employees salary budget

वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झाले आहे.आता अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व सह सचिव / उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई) यांनी सदर परिपत्रक काढले आहे.

सन २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

सन २०२३- २०२४ या आर्थिक वर्षातील माहे ऑगस्ट २०२३ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर तरतूद उपलब्ध करून दिली आहे.

हे पण वाचा ~  7th pay commission : महागाई भत्त्याच्या वाढीसाठी उलटी गिनती सुरू, जाणून घ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA किती वाढणार!

प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून पुढील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आली आहे.

वेतन अनुदान शासन निर्णय

सदरील निधी खालील अटींच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात आले आहे.

ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही. 

सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-याने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा.

जिल्हा निहाय वेतन निधी विवरण यादी येथे पहा

Leave a Comment