Salary account : पगार खाते विरुद्ध बचत खाते यांचा अभ्यास करायचा तर पगार किंवा सॅलरी अकाउंट असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी फक्त 10% लोकांनाच त्याचे फायदे माहिती असेल.विशेष म्हणजे पगार घेणारे सुध्दा अनभिज्ञ आहेत.पाहूया सविस्तर माहिती
State Government salary package
सॅलरी अकाऊंट पगार खात्याचे 9 प्रकार त्यापैकी SGSP खात्याचे 4 प्रकार आहेत.या प्रत्येक प्रकारांमधील फरक कर्मचाऱ्यांच्या पदनाम आणि निव्वळ मासिक उत्पन्नावर आधारित आहे.
प्लॅटिनम :- ज्या कर्मचाऱ्यांचे एकूण मासिक वेतन 1 लाख किंवा त्याहून अधिक आहे,अशांना ही ऑफर दिली जाते.
डायमंड :- पगार खात्याचा हा प्रकार अशा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑफर केला जातो, ज्यांचे मासिक उत्पन्न रु.50,001 ते रु.1 लाख दरम्यान आहे.
गोल्ड :- सॅलरी खात्याचा लाभ हा प्रकार 20 हजार ते 50 हजार दरम्यान मासिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना दिला जातो.
सिल्व्हर :- ज्यांना रु.5,000 ते रु.20,000 दरम्यान पगार आहे.अशा कर्मचाऱ्यांना खात्याचा लाभ जातो.
CSP Account Types
कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज प्रकारातल्या पगार खात्याची पात्रता कर्मचाऱ्यांच्या निव्वळ मासिक पगारानुसार आहे.
- प्लॅटिनम : वरील 1,00,000/-
- डायमंड : 50000/- च्या वर आणि 100000/- पर्यंत
- गोल्ड : 25,000/- च्या वर आणि 50,000/- पर्यंत
- सिल्व्हर : 10,000/- दरम्यान आणि 25,000/- पर्यंत
सॅलरी अकाउंटचे काय आहेत फायदे?
- तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते.बॅलन्स नसतानाही तुम्ही 2 महिन्यांच्या पगाराइतके पैसे काढू शकता.
- सॅलरी अकाऊंटसह डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड देखील देते. याशिवाय चेक ते डिजिटल बँकिंगचे सर्व फायदेही उपलब्ध आहेत.
- तुमचे सॅलरी अकाऊंट असल्यास, तुम्हाला लॉकर सुविधेवर 25 % सूट मिळेल.
- सॅलरी अकाऊंटसह तुम्हाला डिमॅट खात्याची सुविधा देखील देते, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करू शकता.
- सॅलरी अकाऊंट असलेल्या ग्राहकांना कर्ज सहज आणि कमी व्याजावर मिळते. बँक लोन प्रोसेसिंग शुल्कावर ५० % सूट देखील देते.
- बॅंक त्यांच्या सॅलरी अकाऊंट असलेल्या ग्राहकांसह विम्याचा लाभ देखील देते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- तुमच्या पगारानुसार कव्हरेज ३० लाख रुपयांपर्यंत असू शकते.
- आपले सॅलरी अकाऊंट असल्यास, तुम्ही तुमच्या बँकेच्या ATM मधून कितीही वेळा मोफत पैसे काढू शकता.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे सॅलरी अकाउंट झिरो बॅलन्सवर देखील उघडता येते. शिल्लक शून्य झाल्यास तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नसते.
- जर आपले मासिक वेतन २५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी SBI मध्ये खातेही उघडू शकता. अशा सॅलरी अकाऊंट ग्राहकांसाठी एसबीआय रिश्ते योजना खूप उपयुक्त आहे.
पगार खाते कोण उघडू शकते खाते?
सरकारी व खाजगी नोकरी करणारा कोणताही भारतीय नागरिक, पगारातून दरमहा किमान १० हजार रुपये कमवत आहे, तो सॅलरी अकाऊंट उघडू शकतो.
तुम्ही SBI सॅलरी अकाऊंट ऑनलाइन देखील उघडू शकता.यासाठी तुम्हाला एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.पण एकदा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बॅंक शाखेत जावे लागते.
कर्मचाऱ्यांचे पगार खाते कोणत्या बँकेत असावे? यासंदर्भात शासनाचा कोणताही शासन निर्णय नाही किंवा महाराष्ट्र शासनाने काढलेला नाही.प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना कोणत्याही बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट उघडता येऊ शकते.
पगार खाते खाते शासन निर्णय येथे पहा – Salary Account
What about Pensioners?