Close Visit Mhshetkari

State employees : धक्कादायक… सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या कलम 353 मध्ये मोठे बदल! पहा सविस्तर

State employees : सरकारी कामात अडथळा कलमाचा गैरवापर होत आहे.या पार्श्‍वभूमीवर लोकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीनुसार राज्य सरकारकडून भारतीय दंड संहिता कलम 353 मध्ये सरकारी कामात अडथळा सुधारणा केली आहे.

विशेष म्हणजे आता कलम 353 गुन्हा जामीनपात्र करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्यात शिक्षेची तरतूद 3 वर्षे वरून 2 वर्षे करण्यात आली आहे.

सरकारी कामात अडथळा कलमात होणार बदल!

लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करणे,धमकावणे,हल्ला किंवा फौजदारीपात्र बळाचा प्रयोग करणे, याबाबत भारतीय दंड संहितेतील कलम 353 मध्ये पूर्वी पाच वर्षे शिक्षेची तरतूद व या कलमांतर्गत दाखल होणारा गुन्हा अजामीनपात्र होता. 353 कलमाखाली दाखल खटला सत्र न्यायालयात चालवला जात असे.

भारतीय दंड संहिता,1980 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1873 या महाराष्ट्रात लागू असलेल्या कायद्यात सुधारणा करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले.

भारतीय दंड संहितेच्या कलम 353 मध्ये व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश शासनाने काढला आहे.

हे पण वाचा ~  Sevanivrutti vay : मोठी बातमी .... सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्ष झाले! शासन निर्णय निर्गमित ...

फौजदारी वकिल ऍड.गणेश माने यांच्या म्हणण्यानुसार मागील काही वर्षांत 353 कलमाचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला जात होता. सदरील कलमानुसार दाखल होणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण पण वाढले आहे. यावरून आरोपाला पृष्टी मिळत आहे. यात केलेल्या सुधारणांमुळे कायद्याचा दुरुपयोग थांबण्यास मदत होईल.

अधिकारी – कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

सरकारी कामात अडथळा या कायद्याचे अधिकाऱ्यांना संरक्षण होते.रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिसांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी सामना करावा लागत असतो. आपण पाहतो वाहतूक पोलीस,मदतीला धावून जाणारे मार्शल यांना मारहाण करणे,धक्काबुकी करणे असे अनेक गैरप्रकार नेहमी होत असतात.

आता सरकारी कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालण्याचे प्रकार वाढतील. धमक्‍या देऊन, मारहाण करून ब्लॅकमेल करुन कामे करून घेणे केले जाईल, अशी भीतीही सरकारी कर्मचारीव्यक्त करत आहेत.

Leave a Comment