Close Visit Mhshetkari

Janmashtmi : श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला कधी आहे? जाणून घ्या तारीख, मुहूर्त

Shri Krishna Janmashtami : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी जन्माष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे. या दिवशी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला.

दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. यावेळी जन्माष्टमीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. या वर्षी जन्माष्टमीचा उपवास केव्हा केला जाईल ते जाणून घेऊया.

श्रीकृष्ण जन्माष्टमी मराठी माहिती

जन्माष्टमीचा सण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते.

मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते.दरवर्षी या तिथीबाबत संभ्रम निर्माण होऊन जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाते. यावेळी जन्माष्टमी कधी आहे ते पाहूया.

Shri Krishna Janmashtami vidhi

जन्माष्टमीच्या दिवशी, लोक खऱ्या भक्तीने उपवास करून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करतात. उपवास अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो. व्रत पाळणाऱ्यांनी सप्तमी तिथीपासून ब्रह्मचर्य पाळायला सुरुवात करावी आणि सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे. जन्माष्टमीच्या दिवशी काही घरांमध्ये श्रीकृष्णाचे बालरूपाची विधीवत पूजा होते. तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जातो. महाराष्ट्रात गोपाळकाला म्हणजे दहीहंडी करण्याची परंपरा आहे.

जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून हातात गंगाजल घेऊन व्रत करण्याचा संकल्प करावा. काही घरांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी सुंदर तबकडी सजवली जातात आणि स्तनपान करणाऱ्या देवकीची किंवा बाळगोपाळाच्या मूर्तीची पूजा केली जाते.

जर तुम्हाला देवकीची मूर्ती सापडत नसेल तर तुम्ही गाय आणि तिच्या वासराचीही पूजा करू शकता. रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांना सुठवडा, फळे, मेवा, पिठाची पंजिरी आणि पंचामृत देखील केले जाते  आणि 56 भोग लावून अश्या प्रकार त्यांची पूजाविधिवत करतात .रात्री देवाचा भोग अर्पण केल्यावर तुम्ही स्वतःही फळ खाऊ शकता.

श्री कृष्ण जयंती मुहूर्त वेळ

बुधवार ६ सप्टेंबर रोजी श्रावण शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांनी सुरू होईल आणि ७ सप्टेंबर रोजी ४ वाजून १५ मिनिटापर्यंत चालेल.यासह ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी रोहिणी नक्षत्र सुरू होईल.

रोहिणी नक्षत्राची समाप्ती ७ तारखेला सकाळी १०.२५ वाजता होईल. सोमवार किंवा बुधवार हा भाद्रपद अष्टमीचा दिवस आहे असा शास्त्रात नियम आहे, त्यामुळे त्या दिवशी जन्माष्टमीचे व्रत ठेवणे गृहस्थांसाठी विशेष फायदेशीर आहे.

यावेळी रोहिणी नक्षत्रही अष्टमी तिथीला येईल असा विशेष योगायोग घडला आहे. अशा स्थितीत ६ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी आणि ७ सप्टेंबर रोजी गोपाळकाला साजरा केला जाईल, हे गृहस्थ आणि सर्वसाठी विशेष फलदायी ठरेल. तर शास्त्रीय नियमानुसार ७ सप्टेंबरला सातव्या दिवशी जन्माष्टमी व्रत करणे  शुभ राहील.

या लेखामध्ये आपण तुम्हाला माहिती दिलेली आहे यामाध्यमातून कोणताही प्रकारे  अंधश्रद्धा पसरवायची नाही.

 

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment