8th Pay Commission : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, केंद्र सरकारकडून दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्यात येते.सातव्या वेतन आयोगाचा विचार करायचा झाल्यास 2016 मध्ये हा वेतन आयोग लागू झाला होता.
8th Pay Commission Updates
सातवा वेतन आयोग लागवण्यापूर्वी 2014 मध्ये वेतन आयोग समिती स्थापन करण्यात आली होती या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार 1 जानेवारी 2026 मध्ये लागू करण्यात आला होता.आता आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 मध्ये लागून होण्याची शक्यता आहे. जर सरकार 2026 मध्ये आठवा वेतन लागू करायचा असल्यास,त्यासाठी आयोगाची स्थापना करावी लागणार आहे.
मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या माध्यमातून सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवण्याची विशेष मागणी करण्यात आली होती. मात्र सरकारने ती वाढवून 2.57 करण्याचा निर्णय घेतला होता.
नवीन वेतन आयोग अपडेट्स
एकूण पगाराला ठराविक आकड्याने गुणून वेतन आयोग नुसार नवीन वेतनश्रेणी निर्धारित करण्यात येते.सहाव्या वेतन आयोगातील सर्वात कमी वेतन 7000 रुपयांवरून 18000 रुपये करण्यात आले होते, तर पेन्शन 3500 रुपयांवरून 9000 रुपये करण्यात आले होते.
सर्वाधिक वेतन 2 लाख 50 हजार रुपये आणि सर्वोच्च निवृत्ती वेतन 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले होते.
फायनान्शिअल एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार,आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर 1.92 वर ठेवला जाऊ शकतो.
सरकारने फिटमेंट फॅक्टरच्या संदर्भात असा निर्णय घेतल्यास किमान वेतन 34 हजार 560 रुपयांपर्यंत वाढेल आणि सेवानिवृत्त झालेल्यांनाही 17 हजार 280 रुपयांपर्यंत वाढू शकते.