Income Tax Return : केंद्र सरकारने इन्कम टॅक्स बाबत मोठा निर्णय जाहीर केलेला असून सरकारने आता कंपन्यांना एक प्रकारे मोठा दिलासा दिला आहे.कंपन्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत एक महिन्यासाठी वाढवण्यात आली, असून आता रिटर्न 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरता येणार आहे.
ITR Filling new updates
सोबतच ज्या कंपन्यांना त्यांच्या खात्याचे ऑडिट करणे आवश्यक आहे अशांनी त्यांच्या लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत सुद्धा 31 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालयाने सोमवार एका निवेदनामध्ये आयटीआर फॉर्म नंबर सात मध्ये आयटीआय भरण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत राहील असे स्पष्ट केलेले आहे.
चालू आर्थिक वर्षाचा विचार करायचा झाला तर सप्टेंबरच्या मध्यापर्यंत निवड प्रत्यक्ष कर संकलन 23.51% ने वाढवून 8.65 लाख कोटी रुपये झाले आहे.आता कंपन्यांनी अधिक आगाऊ कर भरल्यामुळे प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झाल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. या कालावधीत आगाऊ कर भरणा 21% वाढला आहे.