Close Visit Mhshetkari

Tax on EPF : आपल्या पीएफमधून पैसे काढल्यावर केव्हा किती टॅक्स लावला जातो ? पहा सविस्तर

EPF Tax  :  प्रॉव्हिडंट फंड वर आता कर आकारणीला सुरुवात झाल्यानं अनेकांची चिंता वाढत चालली आहे. पीएफ खात्यात वर्षाला अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास व्याजावर कर भरावा लागणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण घोषणा यांनी केली. 

पीएफ व्याजावरील कराचे गणित काय आहे 

भविष्य निर्वाह निधी खात्याचा जास्तीत जास्त फायदा घेणाऱ्यांमुळेच सरकारने हे पाऊल उचलले आहे. वित्त कायदा 2021 मध्ये एक नवीन तरतूद जोडण्यात आली.

एखाद्या कर्मचाऱ्याने भविष्य निर्वाह निधीमध्ये आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान दिल्यास, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर व्याजावर कर भरावा लागेल. समजा खात्यात 3 लाख रुपये असल्यास अतिरिक्त 50,000 रुपयांवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाईल

भविष्य निर्वाह निधीची दोन खाती असावे?

भविष्य निर्वाह निधीमध्ये आता दोन खाती असतील. पहिले – करपात्र खाते आणि दुसरे – करपात्र खाते.

हे पण वाचा ~  ITR Returns : आयकर भरणारासाठी मोठी बातमी,अशी घ्या कर सवलत!

नॉन-टॅक्सेबल: समजून घ्या की ,जर एखाद्याच्या  खात्यात 5 लाख, रुपये जमा केले असतील तर नवीन नियमानुसार 31 मार्च 2023 पर्यंत जमा केलेली रक्कम करशिवाय खात्यात जमा केली जाईल. यावर कोणताही कर लागणार नाही.

जीपीएफमधून पैसे काढल्यावर कर केव्हा लावला जाइल?

पीएफ खात्यातून 5 वर्षांनंतर पैसे काढायचे असतील तर कोणताही कर लागू होत नाही. जर तुम्ही 5 वर्षापूर्वी पीएफमधून पैसे काढत असाल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल.

पैसे टीडीएसप्रमाणे कापले जातात. यामध्येही पीएफ ग्राहकाचे ,पॅन कार्ड लिंक, न केल्यास 20 टक्के टीडीएस कापला जात. तुमचे पीएफ खाते पॅनशी लिंक केलेले नसल्यास 10% दराने टीडीएस कापला जाईल.

Leave a Comment