Close Visit Mhshetkari

Mahagai Bhatta : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात 4 % वाढ

Mahagai Bhatta : केंद्र सरकारच्या कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव 4% महागाई भत्ता देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात घेतला होता. आता खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून आता महागाई भत्ता 50 टक्क्यांवर गेला आहे.

4% महागाई भत्ता वाढ

भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभागाच्या क्रमांक १/१/२०२४-E-II (B), दिनांक १२.०३.२०२४ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१.०१.२०२४ पासून लागू करण्यात आला आहे.

Dearness Allowance hike

आता ४ % वाढीव दराने महागाई भत्ता “Dearness Allowance” व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहणार आहे.

हे पण वाचा ~  Dearness Allowance : खुशखबर ... आता कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मिळणार महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट! किती आणि केव्हा वाढणार डीए ...

सदरील शासन निर्णाप्रमाणे दि.०१.०१.२०२४ पासून ५०% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.आता राज्य सरकारी कर्मचारी यांना कधी वाढ मिळते हे पाहणे उस्तुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment