Close Visit Mhshetkari

Health ID Card : सरकारच्या ‘या’ खात्यातील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह कुटुंबांना मिळणार मोफत उपचार ! 27 लाख लोकांना फायदा ..

Health ID Card : नमस्कार मित्रांनो,सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आणखी एक बातमी समोर आलेली आहे ज्याद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना 27 लाखाचा विमा संरक्षण किंवा मेडिक्लेम मिळणार आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर.

Unique medical identification card 

मित्रांनो भारतीय रेल्वेने आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचारी व तसेच सर्व कर्मचाऱ्यांचा नातेवाईकांसाठी सदरील निर्णय घेतलेला आहे. रेल्वे विभागातील आरोग्य खात्याने या धोरणामध्ये मोठा बदल केला आहे.

आता याचा फायदा रेल्वे कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेले व इतकेच नाही तर पेन्शनर्स यांना देखील होणार आहे.केंद्र सरकारच्या अखेरीत असलेल्या रेल्वे विभागाने रेल्वे खात्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत.

आता शंभर रुपयात युनिक कार्ड

रेल्वे विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी एक नवीन प्रणाली विकसित केलेली आहे. रेल्वे कर्मचारी व त्यांच्या वर अवलंबून असणारे कुटुंबीय याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासाठी एक युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन म्हणजेच युएमआयडी कार्ड जारी केले जाणार आहे.

सदरील मेडिकल युनिक कार्डच्या माध्यमातून कोणत्याही रेफरन्स शिवाय रेल्वेचे ठराविक हॉस्पिटल व सर्व एम्समध्ये मोफत उपचार घेता येणार आहेत.

या कार्डचे वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास कार्ड फक्त 100 रुपये शुल्क भरून जारी करण्यात येणार आहे.रेल्वे खात्यातील सुमारे 12.50 लाख कर्मचारी तसेच 15 लाख पेन्शनर आणि यांच्यावर ऑलम्पिक करणाऱ्या 10 लाख सदस्यांना याचा फायदा मिळणार आहे.

दवाखान्याच्या रेफरल संदर्भात अनेक तक्रारी येत असत.डॉक्टर आपल्या आवडीच्या रुग्णालयाचे नावाने रेफरल जारी करत असल्यामुळे, कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत असे आता या प्रकाराला पूर्णपणे आळा बसणार आहे.

युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन कार्डचे महत्व ?

  • रेल्वेमध्ये कार्यरत कर्मचारी (railway employees) पेन्शनर व अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमद्वारे त्यांच्या विनंतीवरून सदरील कार्ड उपलब्ध करून दिले जाईल.
  • हेल्थ कार्ड कर्मचारी तसेच पेन्शनर त्यांच्या डिजिलॉकर मध्ये सुद्धा ठेवू शकणार आहे. सदरील हेल्थ कार्ड HMIS App वर संबंधित कर्मचारी व पेन्शनरच्या प्रोफाईलवर देखील उपलब्ध होईल.
  • रेल्वेच्या या हेल्थ कार्ड च्या माध्यमातून रेल्वे कर्मचारी, रेल्वे पॅनल मधील कोणती आरोग्य संस्था असेल त्यामध्ये उपचार घेऊ शकणार आहे. त्यासाठी कुठल्याही रेफ्रिजची गरज भासणार नाही.
  • भारतीय रेल्वेची सर्व दवाखाने त्याचबरोबर पॅनल मधील दवाखाने डायग्नोसिस सेंटर मध्ये इमर्जन्सी किंवा सामान्य उपचार घेण्यासाठी या कार्डचा वापर करता येईल.
युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन कार्ड नसेल तर….

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेन्शनधारक किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाकडे सदरील युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन कार्ड जारी न झाल्यास देखील उपचार मिळू शकणार आहेत. रुग्णालयाशी संपर्क केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या माहितीच्या आधारे युएमआयडी नंबर दिला जाईल. कर्मचारी सुविधांपासून वंचित राहणार नाहीत.

युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन कार्ड माध्यमातून आता 25 एम्स, पीजीआयएमइआर चंदिगड, जेआयपीएमईआर पुद्दूचेरी आणि निमहन्स बेंगलोरची OPD आणि IPD मोफत उपचार मिळणार आहेत.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment