Close Visit Mhshetkari

Income tax : आयकर विभाग पाठवू शकतो 6 प्रकारची नोटीस? चूक केली तर तुम्हालाही मिळू शकते!

Income tax returns : आपण जर इन्कम टॅक्स धारक असाल तर प्राप्तिकर विभागाकडून आपल्याला अनेक प्रकारच्या नोटीस प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे आयकर विभागाकडून योग्य पद्धतीने आपला टॅक्स भरावा या संदर्भात वेळोवेळी सल्ला दिला जातो.

आपल्याला जर काही समस्या असल्यास आपण इन्कम टॅक्स विभागाशी संपर्क करू शकता.आज आपण आपल्याला येणाऱ्या सहा प्रकारच्या आयकर नोटीसी संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Income tax Notice

  1. आयकर धारकाने जर उत्पन्नाशी संबंधित कोणतीही चुकीची माहिती भरली,असे मूल्यांकन अधिकाऱ्याला (AO) वाटत असल्यास आयकर धारकास कलम 143(2) अंतर्गत नोटीस दिली जाऊ शकते.
  2. कलम 156 अंतर्गत ज्यावेळी मुल्यांकन अधिकाऱ्याला कोणतेही टॅक्स,व्याज,दंड किंवा व्यक्तीकडून इतर राशीची मागणी केली जाऊ शकते.
  3. मागील वर्षीचा आयकर भरायचा बाकी असल्यास करदात्याला कलम 245 अंतर्गत नोटीस पाठवली जाते. अशा करदात्याला आयकर रीटर्न सुध्दा उशिरा दिला जातो.
हे पण वाचा ~  Income Tax Notice : या 5 प्रकारच्या व्यवहारावर इन्कम टॅक्स विभागाकडून मिळू शकते नोटीस!

आयकर नवीन नियम 2023

  1. कलम 139(9) अंतर्गत रिटर्नमधील अपूर्ण किंवा विसंगत माहितीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रिटर्नस सदोष मानला जाऊ शकतो. आयकर दात्यांना अशा सूचना दिल्यापासून 15 दिवसांच्या आत ITR भरणे आवश्यक असते.
  2. आर्टिकल 142(1) नुसार एखादी करदात्याने किंवा संस्थाने आधीच आयकर रिटर्न भरलेला आहे, पण आयकर विभागाला अधिक माहिती सादर करणे आवश्यक आहे असे वाटल्यास, तेव्हा नोटीस जारी केली जाऊ शकते. 
  3. कलम 148 अंतर्गत आयकर विभागाला कमी इन्कम दाखवून, टॅक्स कमी भरल्याचा संशय आल्यास आयकर विभाग गेल्या मूल्यांकन ITR पुन्हा भरण्यासाठी सांगते.

Leave a Comment