Employee pramotion : राज्यातील पोलीस दलामध्ये पोलीस निरीक्षकाचे 30 टक्के पदे रिक्त असल्याची बातमी मागील आठवड्यात एका वृत्तपत्रांनी दिली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री तसा गृहमंत्री यांनी सदरील बातमीची दखल घेऊन पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.
पोलीस विभागातील प्रमोशनला होणार!
सहायक पोलिस निरीक्षक ते पोलिस निरीक्षकपदावर दोन वर्षांत पदोन्नती देण्यात आली नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.पोलिस महासंचालक कार्यालयाने ऑगस्ट २०२३ पर्यंत निर्माण होणाऱ्या ६७८ पोलिस निरीक्षकांच्या रिक्त पदांसाठी २१ मार्च २०२३ रोजी अधिकाऱ्यांची निवड करून यादी गृह विभागास पाठवली होती.
एप्रिल २०२३ मध्ये पदोन्नती प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याची विनंती केली होती.न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या ८४ पदांना सोडून किमान उर्वरित पदांचे आदेश काढण्याची विनंती केली होती,मात्र, गृहविभागाने यात कोणतीही कारवाई केली नव्हती.
पोलिस महासंचालकांनी दि.१४ डिसेंबर रोजी ६७८ सहायक पोलिस निरीक्षकांची महसूल विभागाची पसंती १५ डिसेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश पोलिस अधीक्षक व आयुक्तांना दिलेले आहेत.
नवीन वर्षात मोठी भेट
नवीन वर्षाची भेट म्हणून ६७८ जणांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती मिळेल, अशी चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आहे. दिनांक १३ डिसेंबरच्या वृत्तात सध्या ९६४ पदे रिक्त असून, काही दिवसांत ही संख्या १,१०६ (३१.३३ टक्के) इतकी होणार असल्याचे समोर येत आहे. आता दि.१३ डिसेंबर रोजीच गृहविभागाने तत्काळ पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली आहे.
दिनांक २० नोव्हेंबर रोजी १० भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांना अपर पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आलेली आहे. याचवेळी या चौघांनाही पदोन्नती देणे शक्य होते.
आश्र्वासित प्रगती योजना १०/२०/३० सर्व सरकारी कार्यालयात लागू झालेली नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना लागू झाली आहे परंतु बेस्ट उपक्रमाच्या (बृहन्मुंबई महानगरपालिका अंगिकृत उपक्रम BMC understanding) कर्मचाऱ्यांना लागू नाही , समान हक्क द्यावा ही विनंती