Close Visit Mhshetkari

DA Arrears : मोठी बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांचा 18 महिने थकीत महागाई भत्ता संदर्भात मोठी अपडेट ; आता कर्मचाऱ्यांना …

DA Arrears : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि निराशा जनक बातमी समोर आलेली आहे आपल्याला माहिती आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा डीए सरकारने कोरोना काळात गोठवलेला होता. यासंदर्भात सरकारने आता खुलासा जाहीर केलेला आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर

DA Arrears new update

सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांमार्फत सरकारकडे थकीत मागेभत्यांच्या संदर्भात विचारणा करण्यात प्रसार माध्यम व विविध प्लॅटफॉर्मवर या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या ऐकायला येतात. लोकसभेच्या तोंडावर सदरील महागाई भत्ता फरक देण्यात येईल असे बोलले जात असताना होते, पण सरकारने आत्तापर्यंत यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

सदरील थकीत महागाई भत्ता संदर्भात केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज सिंग चौधरी यांना विचारले असता, त्यांनी कोरोना काळातील 18 महीने महागाई भत्ता फरकाची रक्कम दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे.

हे पण वाचा ~  Dearness allowance : खुशखबर.. 'या' कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

थकीत महागाई भत्ता

केंद्रातील मोदी सरकार तिसऱ्या कार्यकाळात सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र सरकारने कर्मचाऱ्यांची ही मागणी फेटाळून लावल्याने कर्मचाऱ्यांचा मोठा हिरमोड झालेला आहे.

सध्या तरी थकीत महागाई भत्त्याच्या पूर्ततेबाबत कोणताही विचार नसल्यामुळे सदरील फरक मिळणे सध्या तरी शक्य वाटत नाही परिणामी नोकरदार मंडळी सरकारविरुद्ध नाराजी पसरलेली आहे.

Leave a Comment