Dearness Allowance : केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पहा किती वाढणार वेतन ?

Dearness Allowance : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकारने नुकतेच आठव्या वेतन आयोगाची स्थापना केलेली आहे.थोडक्यात 1 जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. तत्पूर्वी लागू होणारा महागाई भत्ता हा शेवटचा महागाई भत्ता असणार कसे कसे पाहुया गणित.

Dearness Allowance New Updates

केंद्र सरकारने 1 जानेवारी 2025 पासून महागाई भत्त्यात (Dearness Allowance)आणि महागाई सवलतीत (Dearness Relief) 2 % वाढ केली होती, ज्यामुळे DA/DR चा दर 55% झाला होता.आता पुन्हा 1 जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात बदल होण्याची शक्यता आहे.

किती वाढ अपेक्षित ?

मित्रांनो, सध्या महागाई भत्त्याचा विचार करायचा झाल्यास सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, महागाई भत्त्यात 2 ते 3 % वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. 

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (औद्योगिक कामगार) च्या आलेखानुसार ही वाढ अपेक्षित आहे. मे आणि जून महिन्यांचा अहवाल अजून आला नसल्यामुळे आकडेवारी नंतरच महागाई भत्ता दरवाढ निश्चित होईल. सध्या महागाई दरात झालेली घट असल्याचे बोलले जात आहे.

सातव्या वेतन आयोगाची शेवटची वाढ ?

आठवा वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केल्यानंतर जुलै 2025 मध्ये मिळणारी महागाई भत्ता वाढ ही शेवटची वाढ असणार आहे, कारण जुलै 2025 ते डिसेंबर 2025 नंतर सातव्या वेतन आयोगाचे मुदत संपणार आहे.

हे पण वाचा ~  7 th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या १८ महिने थकीत महागाई भत्ता व ४६% महागाई भत्ता वाढ संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर...

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर वर प्रश्नचिन्ह!

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि कामगार संघटनांनी महागाई भत्ता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कॅल्क्युलेटर’ मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे.सध्या 12 महिन्यांच्या सरासरीनुसार महागाई भत्ता ठरवला जातो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष महागाई वाढीचा संपूर्ण लाभ मिळत नाही.

संघटनांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

मित्रांनो बँक कर्मचाऱ्याप्रमाणे दर तीन महिन्यांनी मागे भत्ता कार्पोरेशन करण्यात यावा असं कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

सध्या DA किमान पूर्णांक मूल्यापर्यंत दिला जातो (उदा. 42.90 % डीए पात्र असल्यास, फक्त 42 % दिला जातो). याऐवजी पॉइंट-टू-पॉइंट महागाई भत्ता द्यावा.

बँक कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निर्देशांक वापरण्यात त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी ज्या वस्तूंचा वापर होतो, त्यापैकी अनेक वस्तू सरकारी कर्मचारी रोज वापरत नाहीत (उदा. रेफ्रिजरेटर, टीव्ही). सरकारी कर्मचाऱ्यांचा DA मोजण्यासाठी वेगळा ग्राहक किंमत निर्देशांक तयार करावा, जेणेकरून त्यांना खऱ्या महागाईनुसार महागाई भत्ता मिळेल.

सध्या तरी 1 जुलैपासून डीए/डीआरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता अजून जानेवारी 2025 पासून ची वाढ झालेली नाही. सध्या कर्मचाऱ्यांना 53% ने महागाई भत्ता मिळत असून लवकरच 2% ची वाढ होऊन महागाई भत्ता 55 % होईल.

Leave a Comment