Close Visit Mhshetkari

BLO App : बीएलओ मोबाईल ॲप डाऊनलोड करुन वापर कसा करायचा? पहा सविस्तर सर्व माहिती

BLO Mobile App : नमस्कार मित्रांनो सर्व बीएलओ बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोग ब्लॉक घेऊन आज आपण आलेलो आहोत यामध्ये आपल्याला नुकतच निवडणूक आयोगाने BLO ॲप लॉन्च केलेले आहे.

सदरील बीएलओ ॲप मध्ये केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांना विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये फॅसिलिटी त्याचबरोबर उपलब्ध झालेले फॉर्म चेकलिस्ट त्यानंतर होम टू होम सर्वे इत्यादी बाबत कार्यवाही करायची आहे.या संबंधित सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

How to Installed BLO App

सर्वप्रथम बीएलओ बांधवांना आपल्या तहसील कार्यालयाशी संपर्क करून आपला मोबाईल नंबर आणि यादी भाग क्रमांक या ठिकाणी अपडेट करून घ्यावा लागणार आहे.आपल्याला प्ले स्टोअर वरुन BLO मोबाईल ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहे.

BLO मोबाईल ॲप इंस्टॉल केल्यानंतर आपल्याला ते आपल्या मोबाईल मध्ये ओपन करायचा आहे.ओपन केल्यानंतर आपल्याला आपला यूजर आयडी म्हणजे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड या ठिकाणी इंटर करायचा आहे, जो तुम्हाला तहसील कार्यालयाकडून दिल्या जाईल.

यानंतर बीएलओ ॲप आपल्याला एक ओटीपी पाठवेल ओटीपी इंटर केल्यानंतर आपण पुढील आपल्या मोबाईलची सर्व माहिती दाखवेल त्याला अपडेट म्हटल्यानंतर आपण BLO मोबाईल ॲप मध्ये यशस्वीरित्या लॉगिन केलेलं असेल.

बीएलओ प्रोफाईल अपडेट्स

आता मेनू मेनू बार चिन्हावर क्लिक करून वरील स्क्रीनशॉटमध्ये हायलाइट केल्याप्रमाण,खालील माहिती अपडेट्स करू शकता. 

 

  • सर्वप्रथम BLO त्याचे प्रोफाइल संपादित करू शकतो. याठिकाणी आवश्यक बदल मंजुरीसाठी ERO कडे पाठवले जाऊ शकते.परंतु BLO त्याला नियुक्त केलेले भाग बदलू शकत नाही
  • बूथ लेव्हल ऑफिसर्सशी थेट संवाद प्रस्थापित करण्यासाठी ECI BLO ई पत्रिका याठिकाणी पाहायला मिळते.
  • सदरील अँपच्या कार्याबाबत फीडबॅकसाठी शेअर करू शकणार आहे.
  • BLO हे वैशिष्ट्य वापरून BLO ॲपमधून लॉग आउट करू शकता.
  • Facilities updates on BLO App
  • Facilities आयकॉनवर क्लिक करून (वर दाखवल्याप्रमाणे) BLO PS मध्ये सुविधा पाहण्यास आणि अपडेट करता येणार आहे.
  • आपले BLO App डाऊनलोड केल्यानंतर होम पेज वर सर्वात शेवटी Facilities’ या पर्यायालर क्लिक करायचे आहे.
  • Capture GPS Co-ordinates’ वर क्लिक केल्यावर BLO नकाशावर PS चे GPS स्थान निवडण्यास आणि सेट करता येईल.
  • यानंतर आपण पोलिंग स्टेशन फोटो मध्ये BLO PS चे फोटो अपलोड आणि चिन्हांकित करू शकता.
  • BLO AMF / EMF ‘उपलब्ध’ किंवा ‘उपलब्ध नाही म्हणून अपडेट करायचे आहे. यामध्ये आपण त्यांना स्थिती कशी आहे हे पण सेट करू शकतो.

 

BLO Mobile App Marathi

सदरील BLO App चा वापर करण्यासाठी बीएलओ बांधवांना आपल्या मोबाईल मध्ये खालील गोष्टी आवश्यक आहे

  1.  कॅमेरा 5 मेगापिक्सेल
  2. उपलब्ध स्टोरेज 5 GB
  3. रॅम 2 जीबी
  4. इंटरनेट कनेक्शन
  5. GPS सुविधा
  6. आवृत्ती : लॉलीपॉपच्या वर

जर मोबाईलने वरीलपैकी कोणतीही अट पूर्ण केली नाही तर BLO ला बीएलओ ॲप वापरता येणार आहे. परंतु जेव्हा ही गहाळ कार्यक्षमता आवश्यक असेल तेव्हा, पॉप अप मोबाइल फोनचे ते वैशिष्ट्य वापरण्यासाठी प्रवेशासाठी विचारले जाईल.

टिप- सदरील महिती फक्त बीएलओ बंधू – भगिनींसाठी शैक्षणिक हेतूने बनवली आहे. सविस्तर माहिती आपल्या निवडणूक विभागासोबत चर्चा करून मिळवून खात्री करा.

1 thought on “BLO App : बीएलओ मोबाईल ॲप डाऊनलोड करुन वापर कसा करायचा? पहा सविस्तर सर्व माहिती”

Leave a Comment