Extra Increment : आता या कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ; शासन निर्णय निर्गमित …

Extra Increment : मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक १८८१/२०२३ व इतर याचिकांमध्ये दि.१६.०२.२०२३ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने दि.३० जून रोजी सेवा निवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या दि.०१ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.२८.०६.२०२३ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

Extra Increment new rules

सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम, २०१९ हे दि.०१.०१.२०१६ पासून लागू करण्यात आले आहेत. सदर नियमातील नियम १० अन्वये दि.०१ जुलै अथवा दि.०१ जानेवारी असे वेतनवाढीचे दिनांक ठरविण्यात आले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या दि.२०.०५.२०२५ रोजीच्या ज्ञापनाव्दारे दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय केली आहे. त्याच धतींवर दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

हे पण वाचा ~  State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाची बातमी! मुख्यालयी राहण्यापासून लवकरच सुटका ...

शासन परिपत्रक, वित्त विभाग, दि.२८.०६.२०२३ नुसार दि.३० जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि.०१ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय केली आहे. त्याच धर्तीवर दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय करण्यात येत आहे..

त्यानुसार शासन परिपत्रक, वित्त विभाग, दि.२८.०६.२०२३ मधील सूचना, दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात येत आहेत. सर्व विभागांनी दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत दि.२८.०६.२०२३ रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी.

दि.०१ जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद सातव्या वेतन आयोगात दि.०१.०१.२०१६ पासून अंमलात आली असल्याने, सदर तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर दि.०१.०१.२०१६ पासून लागू राहील.

Leave a Comment