Pension Scheme : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची एक मोठी आणि बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण झाली आहे. सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS Pension Scheme) आणि एकात्मिक पेन्शन योजना (UPS) अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘लाईफ सायकल’ आणि ‘बॅलन्स्ड लाईफ सायकल’ या दोन नवीन गुंतवणूक पर्यायांना मंजुरी दिली आहे.
NPS Scheme new investment
केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS Scheme अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ‘लाईफ सायकल’ आणि ‘बॅलन्स्ड लाईफ सायकल’ या दोन नवीन गुंतवणूक पर्यायांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची एक मोठी आणि जुनी मागणी पूर्ण झाली आहे.
सदरील निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती निधीचे (Retirement Fund) व्यवस्थापन करण्यासाठी अधिक लवचिकता आणि स्वातंत्र्य मिळेल. आता ते त्यांच्या सोयीनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकतील.
आधीचे पर्याय काय होते ?
आतापर्यंत, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकडे प्रामुख्याने दोन पर्याय होते.
1. डिफॉल्ट स्कीम : PFRDA द्वारे वेळोवेळी निश्चित केलेला गुंतवणुकीचा एक ठरलेला पॅटर्न.
2. स्कीम-जी (Scheme-G) : यात १००% गुंतवणूक फक्त सरकारी रोख्यांमध्ये (Government Securities) केली जाते, ज्यात जोखीम कमी असते.
काय आहेत नवीन पर्याय ?
आता मंजुरी मिळालेल्या दोन नवीन पर्यायांमुळे कर्मचाऱ्यांना इक्विटीमध्ये (शेअर बाजार) गुंतवणूक करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळेल.
लाईफ सायकल (Life Cycle)
सदरील पर्यायात, कर्मचाऱ्याच्या वयानुसार इक्विटीमधील गुंतवणूक आपोआप कमी होत जाते. जसजसे वय वाढते, तसतशी जोखीम कमी करण्यासाठी पैसा इक्विटीमधून काढून सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवला जातो.
- LC-25 : यामध्ये जास्तीत जास्त २५% गुंतवणूक इक्विटीमध्ये असते. वयाच्या ३५ वर्षांपासून ते ५५ वर्षांपर्यंत ही गुंतवणूक हळूहळू कमी केली जाते.
- LC-50 : यामध्ये जास्तीत जास्त ५०% गुंतवणूक इक्विटीमध्ये करता येते.
- LC-75 : यामध्ये जास्तीत जास्त ७५% गुंतवणूक इक्विटीमध्ये करता येते. ही गुंतवणूक सुद्धा वयाच्या ३५ ते ५५ दरम्यान हळूहळू कमी केली जाते.
बॅलन्स्ड लाईफ सायकल (Balanced Life Cycle – BLC)
मित्रानो ‘LC-50’ पर्यायाचाच एक सुधारित प्रकार आहे.यातील मुख्य फरक हा आहे की, यात इक्विटीमधील गुंतवणूक वयाच्या ४५ व्या वर्षापासून कमी होण्यास सुरुवात होते (LC पर्यायांमध्ये ती ३५ व्या वर्षापासून सुरू होते). कर्मचाऱ्याला जास्त काळासाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करून अधिक परतावा मिळवण्याची संधी मिळते.