DA Hike : सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय घेऊ शकतं. महागाई भत्ता वाढी संदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.
DA hike New Update
केंद्र सरकार सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देऊ शकते.आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DA) वाढवून देऊ शकते.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तर पेन्शनधारकांना महागाईपासून बचाव करण्यासाठी रक्कम (Dearness Relief) दिली जाते. याचा फायदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शधारक मिळून 1.2 कोटी कर्मचाऱ्यांना होतो.
केंद्र सरकार दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढवू शकतं.सध्या महागाई भत्ता 55 टक्के आहे. त्यामध्ये 3 टक्के वाढ झाल्यास तो 58 टक्क्यांवर जाईल. सदरील Dearness Allowance जुलै 2025 पासून लागू केला जाईल.
फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांचा Dearness Allowance Arrears देखील मिळणार ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो.
सरकार एका वर्षात दोन वेळा महागाई भत्ता वाढवते. जानेवारी ते जून या कालावधीसाठी जानेवारीत तर जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो. गेल्यावर्षी केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढवण्यासंदर्भात घोषणा केली होती. गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर 2024 ला महागाई भत्ता वाढवण्यात आल्याची घोषणा झाली होती. यंदा दिवाळी 20-21 ऑक्टोबरला आहे.
Dearness Allowance Arrears
सातव्या वेतन आयोगानुसार ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आधारावर महागाई भत्ता निश्चित केला जातो. हा फॉर्म्युला 12 महिन्यांच्या सरासरीच्या आकडेवारीवर आधारित असतो. जुलै 2024 ते जून 2025 दरम्यान सीपीआय-आयडब्ल्यू 143.6 होता. जो 58 टक्के महागाई भत्त्याच्या बरोबर आहे. याचा अर्थ जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 3 टक्के वाढवून देऊ शकते.
पगार किती वाढणार?
जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 50 हजार रुपये असेल तर, 55 टक्क्यांनुसार 27 हजार 500 रुपये मिळेल. जर DA 58 % झाला तर महागाई भत्ता 29000 रुपये मिळेल.थोडक्यात कर्मचाऱ्यांचा पगार 1500 रुपयांनी वाढेल. तर, 30 हजार पेन्शन मिळत असेल त्यांना 55 टक्क्यांनुसार डीआर 16हजार 500 रुपये मिळत असेल तर 58 टक्क्यांनुसार 17 हजार 400 रुपये मिळू शकतो.
7th pay Commission नुसार वाढणारा शेवटचा महागाई भत्ता असेल. कारण सातव्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. सरकारने जानेवारी 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे.