Seventh Pay Commission : खुशखबर … आता या राज्य सरकारी कर्मचार्‍यांना लागू झाला नवीन वेतन आयोग …

Seventh Pay Commission : नमस्कार मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती चाललेल्या आंदोलनाला आता यश मिळालेले आहे. तर काय आहे माहिती पाहू. 

Seventh Pay Commission

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू जवळपास 8 वर्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर अशातच महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सदरील वेतन आयोगाचा लाभ अद्याप पर्यंत देण्यात आलेला नव्हता.

राज्यातील इतर महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र, नगर महापालिकेचे उत्पन्न कमी असल्याचे कारण सांगत कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू केला जात नव्हता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना भेटून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला आहे. 

हे पण वाचा ~  Arrears Bill : खुशखबर ...' या'  कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर, २०२३ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीतील थकीत वेतन मिळणार; शासन निर्णय निर्गमित ...

सदरील प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे यांची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली असून संग्राम जगताप यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले आहे.

महानगर पालिका कर्मचारी अपडेट्स

महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा मागील 8 वर्षापासून सदरील वेतन आयोग करण्यासंदर्भात लढा चालला होता, परंतु त्याला अध्यापर्यंत यश मिळाले नव्हते.दरम्यानच्या काळात महापालिका कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये कर्मचार्‍यांनी लाँग मार्चही काढला होता.

आता महापालिका कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. जवळपास १६०० कायमस्वरुपी व २५०० सेवानिवृत्त अशा एकून 4 हजार कर्मचार्‍यांचा फायदा होणार आहे.

Leave a Comment