Close Visit Mhshetkari

EPFO Passbook : आनंदाची बातमी.. 7 कोटी पीएफ खात्यात जमा झाली व्याजाची रक्कम; दोन मिनिटात घरबसल्या असे करा चेक …

EPFO Passbook : नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने ईपीएफ खातेदारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने नुकतेच कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवरच्या व्याजदर संदर्भात मोठी कारवाई केली आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर.

EPFO Transfer Interest Amount

केंद्र सरकारने Employees’ Provident Fund Organization खातेदारांच्या पीएफ खात्यात 8.25% वार्षिक दराने व्याजाची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात केलेली आहे देशभरातील सुमारे सात कोटी खातेदारकांना आता व्याजाची रक्कम आपल्या खात्यात पाहता येणार आहे. 

अर्थात सध्या तरी सर्वच खातेदारांच्या खात्यात रक्कम वर्ग झाली नसली,तरी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती भविष्य निर्वाह निधी संघटने कडून देण्यात आली आहे.

7 कोटी पीएफ खातेदारांना दिलासा

मित्रांनो भारतातील जवळपास सात कोटीहून अधिक पीएफ धारकांना सरकारने दिलासा दिला असून 8.25 टक्के दराने वार्षिक व्याजदर खात्यात जमा करण्यात येत आहे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मंत्रिमंडळांनी केलेल्या शिफारशीनुसार 8.25 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

आतापर्यंत EPFO ने 23,04,516 सदस्यांच्या खात्यात वार्षिक 8.25% व्याजदराने एकूण 9,260.40 कोटी रुपयांची व्याजाची रक्कम जमा केकेली आहे.

How to Check PF Balance

अनेक पीएफ खातेदारांना आपल्या खात्यात रक्कम किती आहे याविषयी कल्पना नसते आता आपण ऑनलाइन किंवा एसएमएसच्या माध्यमातून आपल्या पीएफ खात्यात शिल्लक असलेला रकमेची व जमा झालेल्या रकमेची माहिती घेऊ शकणार आहात. याशिवाय सरकारकडून उमंग अॅप मध्ये सुद्धा पीएफ खाते लिंक करण्याची प्रक्रिया केलेली आहे या तीन पद्धतीने आपण खात्यात शिल्लक रक्कम पाहू शकता.

हे पण वाचा ~  PF Account : नोकरदारांनो, PF खात्यात अशी करा वारस नोंद,नाहीतर अडकू शकते तुमच्या कष्टाची कमाई; पहा सोपी पध्दत

उमंग ॲपद्वारे तपासा बॅलन्स

  • सर्व प्रथम उमंग ॲप डाउनलोड करा.
  • त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून ॲपमध्ये लॉग इन करा.
  • त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा.
  • येथे EPFO पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक टाकून शिल्लक तपासा.

मिस्ड कॉलद्वारे PF शिल्लक तपासणी

आपण मिस्ड कॉलद्वारेही PF Balance जाणून घेऊ शकता. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 अथवा 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन शिल्लक रक्कम जाणून घेता येते.

SMS द्वारे शिल्लक रक्कम माहिती

EPFO कडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO UAN LAN (भाषा) SMS पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाइप करावे आणि मराठी MAR लिहावे.यानंतर लगेचच तुम्हाला सर्व माहिती सहज मिळते.

Leave a Comment