Mahagai Fatta : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईबाध्यात एक जुलै 2023 रोजी 4% ची वाढ करून महागाई भत्ता 46 टक्के दराने दिला जात आहे. परंतु यामध्ये काही कर्मचारी अद्यापही वंचित होते. यांना DA भत्ता वाढदिवसाच्या गिफ्ट मिळालेला आहे, तर पाहूया सविस्तर माहिती
एसटी कर्मचारी महागाई भत्ता वाढ
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीनंतर हा भत्ता लागू होणार आहे. कामगार करारातील थकबाकीच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगार संघटनांना दिले आहे.
महागाई भत्ता,घरभाडे भत्ता,वार्षिक वेतनवाढ आणि त्यांची थकबाकीसह २०१६ – २०२० च्या कामगार करारातील थकीत रक्कमेचे समान वाटप करणे या आणि अन्य मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेने ११ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते.
उद्योग मंत्री उदय संबंध त्यांच्या मध्यस्थीनंतर एसटी कामगार संघटनेमध्ये बैठक पार पडून सदरील महागाई भत्ता देय करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित संप आणि आंदोलन मागे घेण्यात आलेल्या आहे.
आता मागे भत्ता वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. सदरील कर्मचाऱ्यांना 4 टक्के डीए वाढ वाढ होऊन आता महागाई भत्ता 46 टक्के दराने दिला जाणार आहे.