Budget 2024 : अर्थसंकल्पात आयकर संरचनेत बदल नाही ! मग आयकर कसा आकारला जाणार?

Budget 2024 : नमस्कार मित्रांनो आज अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला केला आहे.सर्व करदात्यांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलेले असताना,अंतरिम अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.

आता सध्या कररचना कशी असणार ? नवीन आणि जुन्या प्रणालीतले टॅक्स स्लॅब्स काय आहेत? असा प्रश्न सर्वसामान्य नोकरदार व व्यवसायिकांना पडलेली आहे. तर मित्रांनो आपण आता जुना आणि नवीन स्लॅब कसा आहे याविषयी सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.

New Tax Slab | नवी कार प्रणाली

  • 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करमुक्त
  • 3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर (सेक्शन 87A अंतर्गत टॅक्स रिबेट)
  • 6 ते 9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर (सेक्शन 87A अंतर्गत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स रिबेट)
  • 9 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% कर
  • 12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर
  • 15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के दराने कर
हे पण वाचा ~  Tax on GPF : भविष्य निर्वाह निधी वर्गणी व थकबाकी रक्कमे संदर्भात आयकर विभागाची नवीन नियमावली ! शासन निर्णय निर्गमित ...

न्यू टॅक्स रेजीम म्हणजे नवीन कर प्रणालीत सर्वांनाच म्हणजे वैयक्तिक करदाते,सिनीअर सिटीझन्स,ज्येष्ठ नागरिक, सुपर सिनियर सिटीझन्स,अति ज्येष्ठ या सगळ्यांसाठी एकच करसंरचना आहे.

Old Tax Slab | जूनी कर प्रणाली

  • 2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
  • 2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% आयकर
  • 5 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% आयकर
  • 10 लाखांवरील उत्पन्नावर 30% आयकर

जुन्या कर संरचनेत 60 वर्षांवरील पण 80 वर्षांखालील ज्येष्ठ नागरिंकांचे 3 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे.तर 80 वर्षांवरील अति ज्येष्ठांचे 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे.

Leave a Comment