Close Visit Mhshetkari

SSC-HSC Exam : इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय ….

SSC-HSC Exam : इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेले असून शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे.आता राज्य शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले असून,सद्यस्थितीत म्हणजे 2 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे.

दहावी बारावी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा

मित्रांनो दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे गुणदान पैकीच्या पैकी देण्याचे प्रकार समोर येतात, याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यावर्षी प्रॅक्टिकल ओएमआर गुणपत्रिका ऐवजी ऑनलाईन भरण्याचा निर्णय घेतलेला आहे.शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले असून यामुळे बनावट गुणदानास आळा बसणार आहे.

मित्रांनो इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा १० ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होईल. यावर्षीपासून प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे गुण शिक्षक, प्राचार्यांना www.mahahssboard.in या संकेतस्थळावरील ‘प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड’ लिंकमधून प्रचलित लॉगीन आयडी व पासवर्डचा वापर करून नोंदवावे लागणार आहेत.

आऊट ऑफ टर्न परीक्षा पॅटर्न

प्रॅक्टिकल आणि ओरल ग्रेट अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीत न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेनंतर आऊट ऑफ टर्न परीक्षा घेतली जाणार आहे.नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिले, अशा विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षेसाठी ज्या-त्या कनिष्ठ महाविद्यालय, शाळांना उपलब्ध करून दिले जाईल.

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाकडून बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच दहा मिनिटे अतिरिक्त वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतलेला होता राज्य मंडळाकडून बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रवारी, तर दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे.

हे पण वाचा ~  State Bord Exam : इयत्ता दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ...

कोल्हापूर बोर्डाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी म्हटलं की, “यावर्षी प्रात्यक्षिक, तोंडी ‘परीक्षेचे गुण ‘ओएमआर’ सीटवर न भरता प्राचार्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरण्याच्या राज्य मंडळाच्या सूचना आहेत.

SSC exam online Hall ticket

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार दि. ३१ जानेवारी, २०२४ पासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील.

दहावी परिक्षा हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा

SSC exam Hall ticket

सदरील प्रॅक्टिकल व ओरल परीक्षे दरम्यान गैरप्रकार आढळल्यास संबंधित महाविद्यालयावरती कारवाई करण्यात येणार आहे.विज्ञानाचे प्रयोग न घेता अनेक ठिकाणी तुकड्या बंद पडू नयेत, यासाठी दाखले गोळा करून कॅटलॉगवर विद्यार्थी संख्या दाखविली जातात,अशा तक्रारी आहेत.

Leave a Comment