7th pay arrears : महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये 12 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे पार पडत आहे. हिवाळी अधिवेशनात राज्याचे हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात येत आहे.राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात येत आहे.
7th pay arrears installment
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमधील कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदांचे वेतन, निवृत्ती वेतन, सातव्या वेतन आयोगाच्या तिसरा आणि चौथा हप्ता प्रदान करण्यासाठी रुपये 2728,41,26,000/- इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे.
राज्यातील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन,सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन,सातव्या वेतन आयोगाच्या तिसरा आणि चौथा हप्ता,अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या अघडण्यासाठी आवश्यक निधी राज्यातील वेतन करीता सहाय्यक अनुदाने (वेतन) या लेखाशिर्ष खाली 2,53,36,84/- इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
सातवा वेतन आयोग फरक
राज्यातील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन,सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन,त्याचबरोबर मागणीनुसार अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या अघडणे (अनिवार्य), अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या अघडणे , सहायक अनुदाने ( वेतन ) या लेखाशिर्ष खाली 1,65,61,73/- इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
State employees update
- कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन 2,53,36,84
- सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन 1,17,47,42
- सातव्या वेतन आयोगाच्या तिसरा आणि चौथा हप्ता 1,00,00,00
- अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या अघडणे 1,65,61,73
- एकूण :- 5,36,45,00
सदरील निधीमुळे राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेळेत आणि नियमितपणे वेतन मिळण्यास मदत होईल.