Close Visit Mhshetkari

Dearness allowance: मोठी बातमी ….. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होणार 0 टक्के? काय आहे नवीन प्रणाली …

Dearness allowance : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून महागाई भत्ता संदर्भात नवीन नियम लागू होण्याची शक्यता झालेली आहे.यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात आली होती तर महागाई भत्ता संदर्भात काय आहे नवीन तर तो याविषयी पाहूया सविस्तर.

DA 50 टक्के असल्यास काय होईल?

सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेल्यावर, महागाई भत्ता शून्यावर येईल. याचा अर्थ महागाई भत्त्याची गणना 0 पासून सुरू होईल आणि 50 % नुसार जी रक्कम मिळेल. ती मूळ वेतनात विलीन केली जाईल. सन 2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू करून सरकारने तो शून्यावर आणला. यानंतर आता त्यातील 50 टक्के पुन्हा शून्यावर येईल.

पगारात 9000 रुपयांनी वाढ होणार

महागाई भत्ता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि ५० टक्क्यांपर्यंतची रक्कम मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात जोडली जाईल.

समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्याला 9000 रुपयांच्या 50 % DA मिळेल. परंतु, जर डीए 50 टक्के असेल आणि नंतर महागाई भत्ता मूळ पगारात जोडून शून्यावर आणला जाईल, तर मूळ वेतनात 9000 रुपये जोडले जातील.

हे पण वाचा ~  7th pay arrears : खुशखबर... सातवा वेतन आयोग फरक,ग्रॅच्युएटी,उपदान मिळणार! शासन निर्णय निर्गमित..

महागाई भत्ता शून्य का केला जातो?

जेव्हा जेव्हा नवीन वेतनश्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो. नियमानुसार कर्मचार्‍यांना मिळणारा 100 % डीए मूळ पगारात जोडला जावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, परंतु ते शक्य नाही. 

आर्थिक परिस्थिती अडचणीत येते. मात्र, हे 2016 साली करण्यात आले.सन 2006 साली सहावी वेतनश्रेणी आली, त्यावेळी पाचव्या वेतनश्रेणीत डिसेंबरपर्यंत 187 % भत्ता दिला जात होता.

संपूर्ण डीए मूळ वेतनात विलीन करण्यात आला. त्यामुळे सहाव्या वेतनश्रेणीचा गुणांक 1.87 होता.नवीन पे बँड आणि नवीन ग्रेड पे देखील तयार केले गेले. मात्र, ते पोहोचवण्यासाठी तीन वर्षे लागली.

1 thought on “Dearness allowance: मोठी बातमी ….. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होणार 0 टक्के? काय आहे नवीन प्रणाली …”

Leave a Comment